शहीद महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात, विद्यार्थिनी शिक्षकांच्या भूमिकेत !
schedule05 Sep 25 person by visibility 47 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शहीद महाविद्यालयात शिक्षक दिनाचा कार्यक्रम उत्साहात विद्यार्थिनींनी शिक्षकांविषयी बोलताना म्हटलं, “शिक्षक फक्त धडे शिकवत नाहीत, तर आयुष्य घडवतात. त्यांच्या शिकवणीशिवाय आमचं आयुष्य अपूर्ण आहे. प्रत्येक शिक्षक आमच्यासाठी प्रेरणादायी आहे,” या शब्दांनी वातावरण भावनिक बनले. या अनोख्या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी शिक्षकांची भूमिका साकारत ज्ञानदान केलं, तर काहींनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. उपप्राचार्य सागर शेटगे यांनी विद्यार्थिनींच्या या अभिनव उपक्रमाचं मनापासून कौतुक केलं आणि शिक्षक-विद्यार्थी नातं सदैव मजबूत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली. शिक्षक दिनाच्या या सोहळ्यात प्रा. विशालसिंह कांबळे, प्रा. दिग्विजय कुंभार, प्रा शुभांगी भारमल,प्रा. सिद्धता गौड, प्रा. प्रतिज्ञा कांबळे, प्रा. प्रफुल्ल मस्कर यांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबतच्या आठवणींना उजाळा देत शिक्षक-विद्यार्थी नात्याची गोडी व्यक्त केली.यावेळी विद्यार्थिनी साक्षी मालवेकर गौरी जाधव समृद्धी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सोनम पाटील यांनी प्रास्ताविक केले. सानिका आरेकर, कु. सानिया माने यांनी सूत्रसंचालन केले. अर्पिता गुरव यांनी आभार मानले. हा संपूर्ण कार्यक्रम प्राचार्य प्रशांत पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.