Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात गणेश विसर्जनाची १८ तास जल्लोषी मिरवणूकमहाडिक गटाच्या दूध उत्पादक सभासदांची बैठक, शौमिका महाडिक सोमवारी भूमिका स्पष्ट करणारनोकर भरतीच्या आरोपावरुन सुनील एडकेंचे राजमोहन पाटलांना चॅलेंज, माफी मागण्यासाठी उद्यापर्यंतची दिली मुदत चेअरमनांनी त्यांच्या कोटयातील जागा शिरोळच्या नेत्याला दिली, त्यांचा नातेवाईक बँकेत नोकरीला-राजमोहन पाटीलमाझा मुलगा-भाचा- पुतण्याला बँकेत नोकरीला लावणार नाही- चेअरमन शिवाजीराव रोडे-पाटीलशिक्षक बँकेच्या सभेला गोंधळाचे ग्रहण, एकमेकांच्या उणीदुणीवरुन खडाजंगी ! विरोधकांचा सभात्याग, सत्ताधाऱ्यांची मोठी घोषणा !!गणेश विसर्जन मिरवणुकीत नेत्यांचा हटके अंदाज ! लेझीम नृत्य, साऊंड सिस्टीमवर ताल अन् कार्यकर्त्यांसोबत फेर !!भुयेवाडीत सर्व रोग निदान शिबिर, आयुष्यमान कार्ड वाटपपालकमंत्र्यांचा उद्योजकांशी संवाद, उद्योगांसाठी जागा- कुशल मनुष्यबळसाठी लवकरच बैठकसत्तर लाखाची अॅडव्हान्स रक्कम संचालकांच्याकडे की कर्मचाऱ्यांकडे ? प्रसाद पाटलांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

जाहिरात

 

गणेश विसर्जन मिरवणुकीत नेत्यांचा हटके अंदाज ! लेझीम नृत्य, साऊंड सिस्टीमवर ताल अन् कार्यकर्त्यांसोबत फेर !!

schedule07 Sep 25 person by visibility 588 categoryराजकीय

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन: गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक म्हणजे सार्वजनिक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. मोरयाचा गजर करत बाप्पाला निरोप देण्यासाठी सारेजण मिरवणुकीत सहभागी होतात. या मिरवणुकीत प्रत्येक मंडळ इतरांपेक्षा आपली मिरवणूक आकर्षण ठरावी यासाठी वेगळेपण जपत असतात. मंडळाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि मिरवणूक पाहण्यासाठी लोटलेल्या गर्दीत राजकीय नेत्यांचा हटके अंदाजही साऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिदू ठरतो. २०२५ मधील गणेश विसर्जन मिरवणूक ही त्याला अपवाद नव्हती.  

महापालिका निवडणूक नजीकच्या काळात होणार आहे. यामुळे उत्सवाच्या माध्यमातून लोकांपर्यत पोहोचण्याचे ईप्सितही अनेकांनी साध्य केले. कोणी स्वागत कमानी उभारल्या. कोणी मंडळाचे आधारस्तंभ ठरले. दुपारनंतर मिरवणुकीत खऱ्या अर्थाने रंग भरला. सार्वजनिक तरुण मंडळाचे गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होत्या. या मिरवणुकीत राजकीय नेते, आमदार मंडळी सहभागी झाले आणि कार्यकर्त्याच्या जल्लोषाला आणखी उधाण आले.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर हे मित्र-प्रेम तरुण मंडळाच्या मिरवणुकीत गणरायाच्या रथाचे सारथ्य केले. हाराफुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीत गणेशमूर्ती होती. गणेश विसर्जन मिरवणुकीत मित्र-प्रेम तरुण मंडळाची मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण असते. आमदार क्षीरसागर हे मिरवणुकीत सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी मिरवणुकीत विविध पक्षाच्या स्वागत कक्षाला भेट दिली. सार्वजनिक तरुण मंडळाच्या मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य करायला सुरुवात केली. आमदार पाटील यांनीही कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला.

युवराज मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पाटाकडील तालीम मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे उद्घाटन झाले.  डीजेच्या तालावर कार्यकर्ते नृत्य करत होते. कार्यकर्त्यांच्या सोबत युवराज मालोजीराजे यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला. हात उंचावत नृत्य केले. मधुरिमाराजे छत्रपती यांचा मिरवणुकीतील सहभाग हा लक्षवेधी होता. विविध मंडळाच्या गणेशमूर्तीचे दर्शन घेत त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होत्या. श्री अमर तरुण मंडळाच्या मिरवणुकीत त्या  महिलांच्यासोबत लेझीम खेळल्या. महिला व युवतींसोबत लेझीम खेळत त्यांचा आनंद द्विगुणित केला.

…………………….

प्रत्येक पक्षाची स्वागत कक्ष, इच्छुकांची दिवसभर ऊठबस

विसर्जन मिरवणूक मार्गावर प्रत्येक पक्षाचे स्वागत कक्ष उभारले होते. या स्वागत कक्षात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची व इच्छुक उमेदवरांची दिवसभर ऊठबस सुरू होती. इच्छुक उमेदवारांनी उत्सव आणि मिरवणुकीत वेगवेगळया माध्यमातून लोकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. स्वागत कक्षातून मंडळांना मानाचा श्रीफळ व पानुसपारी देण्यात येत होते. ज्या त्या पक्षाचे नेते, प्रमुख पदाधिकारी स्वागत कक्षात थांबून मंडळाचे स्वागत करत होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes