कोल्हापुरात लवकरच आयटी क्षेत्रातील उद्योजकांची परिषद- उद्योगमंत्री उदय सामंत
schedule06 Sep 25 person by visibility 44 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील आयटी पार्कला राज्य सरकारच्या उद्योग विभागाने तत्वत : मंजुरी दिली आहे. पावसाळयानंतर कोल्हापुरात आयटी क्षेत्रातील उद्योजकांची परिषद घेणार आहे.’असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. येथील शाहूपुरी तिसऱ्या गल्लीतील शिवतेज तरुण मंडळातर्फे लोकवर्गणीतून शिवतेज गणेशासाठी एक किलो सोन्याचा हार तयार केला आहे. उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते शु्क्रवारी (सहा सप्टेंबर २०२५) हा सोन्याचा हार शिवतेज गणेशला अर्पण करण्यात आला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, ऋतुराज क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली. उद्योगमंत्री सामंत यांनी ‘आयटी पार्कसाठी जागेचा सर्व्हे व ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. पावसाळा संपला की कोल्हापुरात आयटी परिषद होईल. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होणार आहे. तसेच नवीन एमआयडीसीसाठी जागेचा शोध सुरू असल्याचे सांगितले. याप्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, रमेश पुरेकर, मंडळाचे अध्यक्ष महेश खोत, मंत्र चिपळूणकर, शुभम नलवडे, नितीन चिपळूणकर, उमेश पवार आदी उपस्थित होते.