भुयेवाडीत सर्व रोग निदान शिबिर, आयुष्यमान कार्ड वाटप
schedule06 Sep 25 person by visibility 72 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर तालुक्यातील भुयेवाडी येथे सर्व रोग निदान शिबिर, आयुष्यमान भारत कार्ड वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन "शिवप्रेमी मित्र मंडळ भुयेवाडीतर्फे करण्यात आले होते. भुये प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रीमती भोसले, शोभा सूर्यवंशी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. प्राथमिक आरोग्य केंद्र कमिटी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे करवीर विधानसभा अध्यक्ष संभाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्या गीता चौगले, मंडळाचे अध्यक्ष प्रसाद चव्हाण, सचिव वैभव ढेरे आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. आनंद ढेरे यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद चव्हाण यांनी आभार मानले. याप्रसंगी संभाजी गायकवाड, मनोज पाटील,भास्कर तळेकर, प्रल्हाद पाटील, गणेश माने,मोहन तळेकर,रमेश माने, साधना भिसे, अरविंद कोळेकर, चिन्मय शिंदे,औदुंबर कोळेकर,विलास आळवेकर, बाळासो पाटील आदी उपस्थित होते. दर रविवारी जोतिबा दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांच्या वाहनांचे मोफत पंक्चर काढणारे कृष्णात पाटील व सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा लाभ असंख्य नागरिकांनी घेतला.