गोकुळच्या सत्तारुढ संचालकांची पार्टी मीटिंग ! दुपारी एक वाजता बोर्ड मीटिंग
schedule15 May 25 person by visibility 131 categoryराजकीय
!!महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून राजकीय नाट्य रंगत चालले आहे. गोकुळच्या संचालकांची गुरुवारी 15 मे रोजी दुपारी एक वाजता बोर्ड मिटींग होत आहे. बोर्ड मीटिंग होण्याअगोदर सत्ताधारी संचालकांची गोकुळ शिरगाव येथील गोकुळ प्रकल्प कार्यालय येथे पार्टी मीटिंग होते गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता ही पार्टी मीटिंग होती. गोकुळ शिरगाव येथील प्रकल्प कार्यालयात होणाऱ्या बैठकीचे स्थळ बदलले. आणि ही पार्टी मीटिंग ताराबाई पार्क येथील कार्यालयात झाली. दुपारी एक वाजता होणारे बोर्ड मिटिंग वेळेनुसार होईल असे संकेत मिळत आहेत. या बैठकीकडे चेअरमन अरुण डोंगळे उपस्थित राहणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान , गोकुळमधील सत्ताधारी संचालक मंडळाची बैठक ताराबाई पार्क येथील कार्यालयात झाली.
गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे गोकुळच्या राजकारणात नव्याने उकळी फुटली आहे. डोंगळे यांनी गोकुळ मधील सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा आदेश डावलला. चेअरमन डोंगळे हे गेले काही दिवस मुंबईत होते त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुंबई दौऱ्यात डोंगळे यांना चेअरमनपद सोडू नका महायुतीकडे गोकुळचे अध्यक्षपद असले पाहिजे असे सांगण्यात आले. त्यानुसार डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला. डोंगळे हे गुरुवारी सकाळी मुंबईहून कोल्हापूरला परतले
विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपण राजीनामा देणार नसल्याचा पुनरुच्चार केला. डोंगळे यांचा हा निर्णय आमदार सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ यांना धक्का आहे. दरम्यान दुपारी एक वाजता गोकुळची बोर्ड मीटिंग होणार आहे. बोर्ड मिटिंगला सगळे संचालक उपस्थित असतात. बोर्ड मीटिंगच्या अगोदर दरवेळी सत्ताधारी संचालकांची पार्टी मीटिंग होते. या सगळ्या घडामोडी च्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी संचालकांची गुरुवारी सकाळी गोकुळ शिरगाव येथील गोकुळ कार्यालयात होणारी पार्टी मीटिंगचे स्थळ बदलण्यात आले. गोकुळमधील सत्ताधारी संचालक ताराबाई पार्क येथील कार्यालयात सकाळी जमले. त्यांनी त्या ठिकाणी एकत्रित बैठक घेतली.