Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
साठाव्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात कोल्हापूरची छाप ! गाभ सिनेमाला दोन पुरस्कार !! चौकशी समितीवर होणार शिस्तभंगाची कारवाई, शालेय पोषण आहार प्रकरण : शिक्षण उपसंचालक महेश चोथेहुतात्मा क्रांती संस्थेतर्फे शुक्रवारी क्रांतिज्योत मिरवणूकनागरी बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निपुण कोरे, उपाध्यक्षपदी विठ्ठल मोरेसर्किट बेंच उद्घाटन समारंभाच्या नियोजनासाठी १८ समित्या, सरन्यायाधीशांचे जंगी स्वागत करणारउघड्यावर कचरा टाकणाऱ्या ३४ खाद्य विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाईसेलेब्रिटीजच्या नव्हे विद्यार्थिनींच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन, विद्यापीठ प्रशासनाने दिला विभागातील मुलींना मान !स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या डिसेंबर-जानेवारीत –राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेग्रामीण भागातील युवती-महिलांनी कौशल्य प्राप्त करून प्रगती साधावी : राजेंद्र चव्हाणराज्य सरकार नांदणी मठासोबत, महादेवी हत्तीणसाठी सुप्रीम कोर्टात जाणार : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक

जाहिरात

 

सेलेब्रिटीजच्या नव्हे विद्यार्थिनींच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन, विद्यापीठ प्रशासनाने दिला विभागातील मुलींना मान !

schedule05 Aug 25 person by visibility 102 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  नवीन इमारतीचे भूमीपूजन समारंभ असो की विस्तारीत इमारतीचे उद्घाटन, पाहुणा ठरलेला असतो.   नेतेमंडळी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते समारंभाचा शुभारंभ ठरलेला. दरम्यान शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागाच्या विस्तारीत इमारतीचा उद्घाटन समारंभ विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आले. जिओइन्फॉर्मेटिक्स विषयाच्या सायली यादव आणि निकिता जाधव या विद्यार्थिनींना बोलावून कुलगुरूंनी त्यांच्या हस्ते कोनशिला अनावरण केले. त्यानंतर कुलगुरू डॉ. डी. टी.  शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्री. एस. पाटील यांनी इमारतीमध्ये फीत सोडवून प्रवेश केला. विद्यापीठ प्रशासनाने, विभागात शिक्षण घेणाऱ्या मुलींना इमारत उद्घाटनचा मान देत वेगळेपण जपले.

भूगोल अधिविभागात नव्याने सुरू करण्यात आलेल्या जिओइन्फॉर्मेटिक्स अभ्यासक्रमांसाठी जागेची आवश्यकता लक्षात घेऊन गतवर्षी ऑक्टोबरमध्ये नूतन विस्तार इमारतीच्या कामास प्रारंभ करण्यात आला. एक वर्ष पूर्ण होण्याच्या आत इमारतीचे उद्घाटन करण्यात आले आहे. ४०७७ चौरस फूट (३७८.९६ चौ. मीटर) इतके तळमजल्याचे बांधकाम झाले आहे. जेनेसिस डिझाईनर्स प्रा. लि. हे आर्किटेक्ट आहेत.

यावेळी सिव्हील कंत्राटदार उदय घोरपडे, अनिरुद्ध घोरपडे आणि विद्युत ठेकेदार श्रीकांत गुजर यांचा कुलगुरूंच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या इमारतीमध्ये वर्गखोल्यांबरोबरच थ्री-डी व्हिज्युअलायझेशन, ड्रोन टेक्नॉलॉजी यांसह जिओइन्फॉर्मेटिक्सशी निगडित प्रयोगशाळाही असणार आहेत. येथे विविध क्षेत्रांतील शासकीय अधिकाऱ्यांसाठी आवश्यकतेनुसार व मागणीनुसार प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचाही विद्यापीठाचा मानस आहे.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी जाधव, डॉ. गिरीष कुलकर्णी, उपकुलसचिव रणजीत यादव, भूगोल अधिविभाग प्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर, डॉ. संभाजी शिंदे, डॉ. धनश्री शिंदे, डॉ. मीना पोतदार, डॉ. विद्या चौगुले, डॉ. प्रशांत पाटील, विद्युत अभियंता अमित कांबळे, विजय पोवार, शिवकुमार ध्याडे, वैभव आरडेकर, जी.बी. मस्ती उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes