उघड्यावर कचरा टाकणाऱ्या ३४ खाद्य विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई
schedule05 Aug 25 person by visibility 33 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील विक्रेत्यांना उघड्यावर कचरा न टाकणेबाबत वारंवार महापालिकेच्या आरोग्य विभागाने सूचना केल्या होत्या. कचरा उठावसाठी सकाळच्या सत्रात घंटागाड व रात्रीच्या डंपरची व्यवस्था करुन देखील काही विक्रेते हे आपल्या हातगाडीवरील कचरा त्याच ठिकाणी उघड्यावर टाकत असल्याचे महानगरपालिकेस निदर्शनास आले. त्यामुळे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या पथकामार्फत अशा ३४ खाद्य विक्रेत्यांवर कारवाई करुन ८२०० रुपयांचा दंड वसूल केला. सहायक आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील यांच्या आदेशाने ही कारवाई झाली. विभागीय आरोग्य निरिक्षक विकास भोसले, आरोग्य निरीक्षक महेश भोसले, विनोद नाईक, नंदकुमार मौर्य, मुकादम व कर्मचारी यांनी ही कारवाई कली. कचरा उघड्यावर, नाल्यामध्ये टाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल असे महापालिकेने म्हटले आहे.