नागरी बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निपुण कोरे, उपाध्यक्षपदी विठ्ठल मोरे
schedule06 Aug 25 person by visibility 18 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी वारणा बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे व उपाध्यक्षपदी भरत बँकेचे संचालक विठ्ठलराव मोरे यांची निवड करण्यात आली. २०२५-३० या वर्षासाठी असोसिएशनची निवडणूक बिनविरोध झाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास यांच्या अध्यक्षतेखाली असोसिएशनच्या संचालक मंडळाची बैठक झाली. यामध्ये अध्यक्षपदासाठी कोरे यांचे नाव संचालक शिरीष कणेरकर यांनी सुचविले. संचालक एम. पी. पाटील यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी मोरे यांचे नाव संचालक सुर्यकांत पाटील यांनी सुचविले. संचालक राजाराम शिपुगडे यांनी अनुमोदन दिले.