हुतात्मा क्रांती संस्थेतर्फे शुक्रवारी क्रांतिज्योत मिरवणूक
schedule06 Aug 25 person by visibility 24 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे शुक्रवारी, आठ ऑगस्ट २०२५ रोजी मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरजकर तिकटी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथून सायंकाळी पाच वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किसन कल्याणकर यांनी दिली. मंत्री, आमदारांच्या उपस्थितीमध्ये मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. क्रांतिज्योत प्रज्वलित करुन मिरवणुकीला सुरुवात होईल.संस्थेतर्फे १९७८ पासून क्रांतिज्योत मिरवणूक काढण्यात येते. १८५७ मधील बंडातील क्रांतिकारकांच्या स्मृती म्हणून उभारलेल्या क्रांतिस्तंभासमोर क्रांतिज्योत प्रज्वलित करण्यात येते. या मिरवणुकीत राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, अधिकारी, तालीम मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग असतो. पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक आर. डी. पाटील, पद्माकर कापसे, मुसा शेख, राजेश पार्टे, प्रवीण मोहिते, दीपक म्हेतर, प्रशांत डकरे, विनायक पाटील, युवराज तेली आदी उपस्थित होते.