Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दाखल्याप्रकरणी तीन शाळांना कारणे दाखवा नोटीस ! विद्यार्थी आंबेवाडीतील शाळेत,  दाखले कोल्हापूर-शाहूवाडीतील शाळेत !!अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी पहिल्या टप्प्यातील १४३ कोटींच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यतात्यांच्या-आमच्या मनातील शंका बोलत बसलो तर मतभेद वाढतील,  महाडिकांच्या प्रश्नांचे निरसन गोकुळचे संचालक मंडळ करेल : मंत्री हसन मुश्रीफकोल्हापुरात आजपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा, सी-डी वार्डला दैनंदिन पाणीपुरवठाशिवसेना किसान सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रा. जालंदर पाटील, सचिवपदी जनार्दन पाटीलगोकुळच्या अधिकाऱ्यांना नोटिसा, संचालकांवर कारवाई न करण्याचे कारण काय ? सर्किट बेंचची विचारणउद्योगांसाठी वीज दराच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी संयुक्त समिती स्थापनताराबाई पार्कातील गोकुळ कार्यालयात गणेशोत्सव साजरामाझ्या लेकी, ही माफी स्वीकार ! पण आमचे बहाणे कधीच मानू नकोस !! विवेकानंदमध्ये तरुणांच्या हक्काचे व्यासपीठ-व्हिजन १०० !

जाहिरात

 

पंचगंगा-कृष्णेच्या पाण्यात विद्रोहाचा प्रवाह, या दोन नद्यांच्या काठावर सर्वाधिक क्रांतिकारक घडले-उत्तम कांबळे

schedule25 Aug 25 person by visibility 96 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :‘ पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाण्यात विद्रोहाचा प्रवाह आहे. म्हणून महाराष्ट्र राज्यातील सगळयात अधिक क्रांतीकारक पंचगंगा आणि कृष्णा या दोन नद्यांच्या काठावर जन्माला आलेले आहेत. मोठी माणसे घडली. क्रांतिअग्रणी कॉम्रेड जी.डी.बापू लाड हे सत्ता, संपती, प्रतिष्ठा याच्या पलीकडे जावून मातृभूमीसाठी झगडणारे थोर स्वातंत्र्यसेनानी होते. आपला देश, आपली माणसे आणि एक समाजवादी स्वप्न घेवून ते जगत होते, असे प्रतिपादन विचारवंत उत्तम कांबळे यांन येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागामार्फत भारतीय स्वातंत्र्यलढयातील थोर स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक क्रांतिअग्रणी जी.डी. लाड यांच्या नावे अध्यासन सुरू करण्यात आले.  त्याच्या शुभारंभ प्रसंगी 'भारतीय स्वातंत्र्य लढा आणि जी.डी.बापू लाड' या विषयावर ते बोलत होते.  राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील होते, तर आमदार अरूणअण्णा लाड प्रमुख उपस्थित होते.

कांबळे पुढे म्हणाले, जे-जे नवनिर्माणाचे क्षेत्र होते त्या ठिकाणी बापूनीं कामे केलेली आहेत, हे खूप महत्वाचे आहे. त्यांच्या कामांवर त्यांच्या शत्रुनेही टिका केलेली नव्हती. तेवढे निकोप कामे त्यांनी केलेली आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेत जाणार एक गट तयार झाला आणि दुसरा गट देशाचे नवनिर्माण कसे करावे. तसेच, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक गुलामगिरी नष्ट कशी करता येईल, हे पाहणाऱ्या गटामध्ये बापू होते. बापूंसारख्या माणसांची आज खऱ्या अर्थान गरज आहेराज्यामध्ये जेवढे-जेवढे विद्यापीठे आहेत तेवढया सगळया विद्यापीठांनी आपल्या आजू-बाजूच्या परिघात घडलेला इतिहास अभ्यासाच्या रूपाने आपल्या विद्यार्थ्यांसमोर आणावा. ’

आमदार अरुण लाड म्हणाले, ‘क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.(बापू) लाड यांनी केले कार्य, चळवळ समाजापर्यंत पोहचले पाहिजे. त्यांच्या लढयातील वस्तुनिष्ठ इतिहास समाजापुढे आणावा, हा प्रमुख उद्देश अध्यासन केंद्राचा आहे.  समाज हेच त्यांचे कुटुंब होते.  स्वातंत्र्य लढयामध्ये त्यांनी स्वत:ला झोकून दिले.  अन्याय, अत्याचार आणि दृष्टप्रवृत्तींच्या विरोधात ते नेहमी आक्रमक होते.’     याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास शिंदे, श्रीमती सरोज पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाहीर सदाशिव निकम यांनी पोवाडा सादर केला. अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ.रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले.  डॉ.नंदकुमार मोरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परियच करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सृत्रसंचालन केले. डॉ.नवनाथ गुंड यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes