Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दाखल्याप्रकरणी तीन शाळांना कारणे दाखवा नोटीस ! विद्यार्थी आंबेवाडीतील शाळेत,  दाखले कोल्हापूर-शाहूवाडीतील शाळेत !!अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी पहिल्या टप्प्यातील १४३ कोटींच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यतात्यांच्या-आमच्या मनातील शंका बोलत बसलो तर मतभेद वाढतील,  महाडिकांच्या प्रश्नांचे निरसन गोकुळचे संचालक मंडळ करेल : मंत्री हसन मुश्रीफकोल्हापुरात आजपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा, सी-डी वार्डला दैनंदिन पाणीपुरवठाशिवसेना किसान सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रा. जालंदर पाटील, सचिवपदी जनार्दन पाटीलगोकुळच्या अधिकाऱ्यांना नोटिसा, संचालकांवर कारवाई न करण्याचे कारण काय ? सर्किट बेंचची विचारणउद्योगांसाठी वीज दराच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी संयुक्त समिती स्थापनताराबाई पार्कातील गोकुळ कार्यालयात गणेशोत्सव साजरामाझ्या लेकी, ही माफी स्वीकार ! पण आमचे बहाणे कधीच मानू नकोस !! विवेकानंदमध्ये तरुणांच्या हक्काचे व्यासपीठ-व्हिजन १०० !

जाहिरात

 

कोल्हापुरात आजपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा, सी-डी वार्डला दैनंदिन पाणीपुरवठा

schedule28 Aug 25 person by visibility 647 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील तीन पंपापैकी एक पंप नादुरुस्त झाल्याने शहरातील नागरिकांना पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. पंप कार्यान्वित होईपर्यंत पूईखडी जलशुद्धीकरण केंद्रावर अवलंबून असणाऱ्या शहरातील ए, बी व ई वॉर्ड तसेच संलग्न उपनगर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. यापद्धतीने गुरुवार 28 ऑगस्ट 2025 पासून पाणीपुरवठ्याचे नियोजन  आहे

28 ऑगस्ट 2025 पासून ए व बी वॉर्ड तसेच संलग्न उपनगर आणि ग्रामीण भागातील परिसरात एक दिवस आड पाणीपुरवठा होईल. या अंतर्गत पूईखडी परिसर, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी परिसर, आपटेनगर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, जरगनगर, नानापाटील नगर, तुळजामवानी कॉलनी, देवकर पाणंद, साळोखेनगर, राजीव गांधीनगर, महाराष्ट्र नगर, सुर्वेनगर, आयटीआय परिसर, जोगेश्वरी कॉलनी, रायगड कॉलनी, बालाजी पार्क, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, विजयनगर, संभाजीनगर, शेंडापार्क आदी सर्व परिसरांचा समावेश आहे.

शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025 पासून ई वॉर्डात एक दिवस आड पाणीपुरवठा होईल. यात राजारामपुरी 1 ली ते 13 वी गल्ली, मातंग वसाहत, यादवनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, टाकाळा, पांजरपोळ, सम्राटनगर, दौलतनगर, शाहूपूरी, राजेंद्रनगर, रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क, लोणार वसाहत, लिशा हॉटेल परिसर, महाडीक वसाहत आदी परिसरांचा समावेश आहे.

 दरम्यान सी व डी वॉर्डला मात्र नियमित पाणीपुरवठा सुरू राहील.तरी नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक  के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे. ज्या भागात नळाद्वारे पाणीपुरवठा होणार नाही, त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कळंबा फिल्टर हाऊस संपर्क :  गणेश लोंखडे (मो. 9766360506). बावडा फिल्टर हाऊस संपर्क :  संभाजी पाटील (मो. 9860448844)

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes