Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दाखल्याप्रकरणी तीन शाळांना कारणे दाखवा नोटीस ! विद्यार्थी आंबेवाडीतील शाळेत,  दाखले कोल्हापूर-शाहूवाडीतील शाळेत !!अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी पहिल्या टप्प्यातील १४३ कोटींच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यतात्यांच्या-आमच्या मनातील शंका बोलत बसलो तर मतभेद वाढतील,  महाडिकांच्या प्रश्नांचे निरसन गोकुळचे संचालक मंडळ करेल : मंत्री हसन मुश्रीफकोल्हापुरात आजपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा, सी-डी वार्डला दैनंदिन पाणीपुरवठाशिवसेना किसान सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रा. जालंदर पाटील, सचिवपदी जनार्दन पाटीलगोकुळच्या अधिकाऱ्यांना नोटिसा, संचालकांवर कारवाई न करण्याचे कारण काय ? सर्किट बेंचची विचारणउद्योगांसाठी वीज दराच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी संयुक्त समिती स्थापनताराबाई पार्कातील गोकुळ कार्यालयात गणेशोत्सव साजरामाझ्या लेकी, ही माफी स्वीकार ! पण आमचे बहाणे कधीच मानू नकोस !! विवेकानंदमध्ये तरुणांच्या हक्काचे व्यासपीठ-व्हिजन १०० !

जाहिरात

 

माझ्या लेकी, ही माफी स्वीकार ! पण आमचे बहाणे कधीच मानू नकोस !!

schedule27 Aug 25 person by visibility 490 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विकास प्रकल्पाच्या नावाखाली निसर्गावर चालविली जाणारी कुऱ्हाड, चकाचक सिमेंटच्या इमारती उभारणीसाठी पर्यावरणाला पोहोचविली जाणारी हानी वाढत्या तापमानामुळे बदलत चाललेले ऋतुचक्र, अचानक ढगफुटी तर कधी दुष्काळाच्या तीव्र झळाहे सारं अस्वस्थ करणारं..दुसरीकडं आधुनिकतेच्या नावाखाली अनेक चांगल्या गोष्टी भूतकाळात जमा करण्याची मानवी समाजाला लागलेली वाईट खोड यामुळे शतकानुशतकाचे साक्षीदार पुढील पिढीसाठी शिल्लक राहतील की नाही ? लाभलेला समृद्ध वारसा पुढील पिढीपर्यंत प्रवाहित राहील का ? हा मनाला लागलेला घोर... सध्याचा विचित्र भवताल सतत मनाला टोचणारंअंर्तबाह्य हलवून टाकणारंमनाला बोचणारं. हा सारा भावभावनांचा कल्लोळ ! संवेदनशीलवृत्तीचा  पालक,‘सरत्या श्रावणात लेकीसाठी माफी मागतो’ मुलीला उद्देशून कागदावर उतरविलेलं हे शब्द प्रातिनिधीक न राहता ते सामाजिक स्थितीवर भाष्य करणाऱ्या ठरतात.

जपान सरकारचे माजी शैक्षणिक सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील यांची ,‘सरत्या श्रावणात लेकीसाठी माफी’ही कविता साऱ्यांना अंतर्मुख करणारी ठरतेय. उच्च शिक्षण क्षेत्रात डॉ. पाटील यांनी अनेक वर्षे काम केले आहे. ते राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी शिक्षण संस्था सुरू केले आहेत. त्यांचे, ‘चंबुखडी ड्रीम्स’ हे आत्मकथनात्मक पुस्तक तर अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलय.  कामाच्या निमित्तानं देश पाहिला, परदेशाची सैर केली. शिक्षणतज्ज्ञ म्हणून परिचित असलेले डॉ. पाटील सध्या पर्यावरण संवर्धनासाठी काम करत आहेत. लिखाणाची आवड असणाऱ्या पाटील यांनी जे सुचलं ते कागदावर उतरविलं आहे. सध्याच्या स्थितीवर भाष्य करणाऱ्या कविता केल्या आहेत. सामाजिक विषयाच्या, निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या, पर्यावरण संवर्धनाचं महत्व अधोरेखित करणाऱ्या कविता आहेत. लवकरच या कवितांचा संग्रह ते प्रकाशित करणार आहेत.

 ‘सरत्या श्रावणात लेकीसाठी माफी‘या शीर्षक असलेल्या कवितेत त्यांनी लिहिलयं

‘ जेव्हा मी तुला दाखवतो पर्वत, नद्या-समुद्राच्या गाभ्यातील प्रवाळभित्ती !

 तेव्हा कुजबुजतो —कदाचित तूच शेवटची पिढी आहेस, जी हे सौंदर्य पाहील,

 श्रावणाच्या सप्तरंगात न्हाऊन जाईल.’

तुझ्या लेकरांना, ग माझ्या लेकी, नकाशावर फक्त नावे उरतील, आणि तुझ्या लेकरांची लेकरं, फक्त संग्रहालयांत पाहतील, हेच होते कधी काळी पृथ्वीवर.’हे निदर्शनास आणतात. पर्यावरणाचा ऱ्हास, वारसा लाभलेल्या ऐतिहासिक वास्तू, प्राचीन स्थळांची होणारी हेळसांड, विकासाच्य नावाखाली निसर्गाचा होणारा विध्वंस हे सारं पाहून कवी पुढे म्हणतो

‘माफ कर आम्हाला —आमची पिढी, स्वतःला हुशार म्हणवणारी, निघाली सर्वांत मूर्ख.
निसर्गाची देणगी लुटली, समुद्र गिळंकृत केला, जंगलं जाळली, आणि त्याला विकास म्हटलं.

ही आमची माफी :आम्ही तुझं भविष्य चोरलं, आता तूच त्यासाठी लढायचं आहे.
तू आणि तुझी लेकरं मानवजातीने कधीही न दिलेला सर्वांत मोठा त्याग करणार—
ही पृथ्वी वाचवण्यासाठी, उरलेलं जपण्यासाठी, निसर्गाशी पुन्हा नातं बांधण्यासाठी.

माझ्या लेकी, ही माफी स्वीकार, पण आमचे बहाणे कधीच मानू नकोस.

तू उभी रहा आमच्यापेक्षा खंबीर, आमच्यापेक्षा कोमल, आणि तुझ्या हातात राहो !

 तुझ्या लेकीचं हसू, आणि एका खळाळणाऱ्या नदीच गीत !!’

डॉ. पाटील यांच्या कविता या निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या आहेत, संस्कृतीशी नातं सांगणाऱ्या आहेत. आशावाद जागविणाऱ्या आहेत, त्यांनी, ‘सुगरणीनो या ग, माघारणींनो या’ या कवितेत म्हटलंय,

‘सुगरणीनो या ग- माघारणींनो या, आला श्रावण–भादवा गीत मायमातीचं गाऊया.

जे सुगरणींचं नातं शिवाराशी- तेच माघारणीचं नातं माहेराशी,
चला घरट्याची वीण घट्ट गुंफू या, गावकुसा–शिवारात आनंद भरू या !’

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes