गोकुळच्या अधिकाऱ्यांना नोटिसा, संचालकांवर कारवाई न करण्याचे कारण काय ? सर्किट बेंचची विचारण
schedule28 Aug 25 person by visibility 178 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील गैरव्यवहारबाबत संचालकावर कारवाई न करण्यामागील कारण काय ?अशी विचारणा सर्किट बेंचने केली आहे. तसेच यासबंधीची कारणमीमांसा स्पष्ट करा अशी नोटिस अधिकाऱ्यांना काढली आहे. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने सरकारी वकिलांना संचालक मंडळांवर कारवाई न करण्यामागचे कारण स्पष्ट करणारे उत्तर दाखल करावे अशा सूचना केल्या आहेत. पुढील सुनावणी १५ सप्टेंबर २०२५ रोजी आहे.
गोकुळ दूध संघातील आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी संचालक मंडळ अपात्र ठरवावे, फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी याचिका वडकशिवाले येथील श्री महादेव सहकारी दूध व्यावसायिक संस्थेतर्फे प्रकाश बेलवाडे यांनी दाखल केली आहे. निविदा प्रक्रियेशिवाय खरेदीविक्री, नियमाना फाटा देऊन गैरबँकिग सहकारी संस्थेला कर्ज देणे, कोट्यवधी रुपयांची थकबाकी, आर्थिक आणि प्रशासकीय कामकाजात अनियमितता या आधारे याचिका दाखल केली आहे. गोकुळचे एमडी, संबंधित अधिकारी आणि संस्थांना नोटिसा पाठविल्या आहेत.