त्यांच्या-आमच्या मनातील शंका बोलत बसलो तर मतभेद वाढतील, महाडिकांच्या प्रश्नांचे निरसन गोकुळचे संचालक मंडळ करेल : मंत्री हसन मुश्रीफ
schedule28 Aug 25 person by visibility 166 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा अध्यक्ष झाल्यानंतर आपण स्वतःला काहीतरी आचारसंहिता घालून घेतली पाहिजे. अन्यथा; विनाकारण मतभेद तयार होतील. आता त्यांच्या मनात काय शंका आहेत ? आमच्या मनात काय शंका होत्या, हेच जर बोलत बसलो तर मतभेद वाढतच राहतील. संचालिका शौमिका महाडिक यांच्या मनातील शंका, प्रश्न निरसन करण्याची जबाबदारी गोकुळचे अध्यक्ष, संचालक मंडळ व अधिकाऱ्यांची आहे. ते त्या दूर करतील. महायुती म्हणून आपण सर्व मतभेद बाजूला ठेवून लक्ष्मणरेषा घालून घ्यायला हवी.’असे मत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.
कोल्हापुरात मंत्री मुश्रीफ हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना विविध प्रश्नावर उत्तरे दिली. गोकुळ दूध संघात संचालिका शौमिका महाडिक गेली चार वर्षे विरोधात होत्या. आपण अशी अपेक्षा व्यक्त केली की, या वेळेला त्या घोषणा देणार नाहीत, फलक घेऊन येणार नाहीत आणि व्यासपीठावर येतील. त्याचवेळी त्या म्हणाल्या आहेत की, अजून आपल्याला उत्तर मिळालेली नाहीत त्यामुळे मी ठरवीन असे महाडिक यांनी म्हटले होते. यासंबंधी प्रश्न उपस्थित केल्यावर मुश्रीफ यांनी उत्तर दिले. तुम्ही आता महायुतीमध्ये आहात. मग नेमकं विरोधक कोण आहे? या प्रश्नावर ते म्हणाले, आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत. विरोधक कोण आहेत, हे तुम्हालाही माहित आहे. आज त्यांचे नाव घेण्याची गरज नाही. महायुती म्हणून काम करीत असताना सर्वांनीच एक लक्ष्मण रेखा आखून घेतली पाहिजे. संयमाने घेतले पाहिजे. नाहीतर महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकल्यासारखे होईल, असे सूचक वक्तव्य मुश्रीफ यांनी केले. गोकुळ दूध संघाच्या टेस्ट ऑडिटच्या संदर्भात उच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. तसेच; गोकुळ दूध संघाच्या जागम आणि घड्याळ खरेदी बाबत. तसेच; संचालक मंडळाच्या गोवा सहलीबाबतही जोरदार चर्चा आहेत. या प्रश्नावर ते म्हणाले, टेस्ट ऑडिटमध्ये काहीही निष्पन्न झाली नाही. जे सर्किट बेंच पुढे गेलेले त्यांना याची कल्पना नसावी कदाचित. ज्यावेळी नोटीस मिळेल त्यावेळी संघ याचे उत्तर देईल.
. दहीहंडीच्या कार्यक्रमात माजी खासदार धनंजय महाडिक म्हणालेत की, बरं झालं मंत्री हसन मुश्रीफ यांना चार वर्षांनी गोकुळ दूध संघामध्ये वासाचे दूध दिसलं. त्यानंतर लगेचच तुम्ही आलात. हे टायमिंग साधून आलात की काय? या प्रश्नावर वासाचे दुधाबाबत मंत्री मुश्रीफ म्हणाले, त्यादिवशी खासदार महाडिक यांची भाषण झाल्यानंतर मी वेळाने आलो दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये मला त्यांचे ते वक्तव्य समजलं. आता गोकुळ दूध संघामध्ये महायुतीचा अध्यक्ष झाला आहे, हे सर्वश्रुत आहे. वासाच्या दुधाबद्दल बामणीच्या कागल तालुका संपर्क मेळाव्यात मी असं म्हणालो होतो की, वासाच्या दुधाबाबत दूध उत्पादकांच्या मनातील शंकांचे निरसन झाले पाहिजे. यामध्ये उत्पादक म्हणतात की, आमचे दूध आम्हाला परत द्या. संघाचे म्हणणे असे आहे की, कायद्याप्रमाणे एकदा दूध घेतले की ते परत देता येत नाही, ते वासाचे निघाल्यास नाश केले पाहिजे. वासाच्या दुधाचे दर संघाने दुप्पट केलेले आहेत. त्यांना मी अशा सूचना दिल्या आहेत की, याबाबतचे तंत्रज्ञान आता प्रगत झाले आहे. दुधात नेमके संस्थेकडून साखर, प्रोटीन, युरिया, पाणी असे पदार्थ मिसळले जातात की, सभासदाकडूनच खराब दूध घातले जाते याची माहिती घेणे गरजेचे आहे यासाठी आता नव्याने विकसित झालेल्या टेक्नॉलॉजीचा आधार घेणे गरजेचे आहे. जेणेकरून सभासदांच्या मनातील शंका दूर होतील.