अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी पहिल्या टप्प्यातील १४३ कोटींच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता
schedule28 Aug 25 person by visibility 35 categoryलाइफस्टाइलमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील १४३.९० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार निधी मागणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला होता. राज्य सरकारच्या नियोजन विभागाकडून निधी मंजुरीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या पहिल्या टप्प्यात पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार मंदिर व परिसराचा जीर्णोद्धार करणे व इतर आवश्यक दुरुस्तीची कामे करण्यात येणार असल्याची माहितीही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. त्यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महायुती सरकारचे आभार मानतो. निधी मंजुरीमुळे लवकरच तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामास प्रारंभ होणार असल्याचे म्हटले आहे. करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याचा १४४५.९७ कोटींचा प्रस्ताव पंधरा जुलै २०२५ रोजी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीसमोर सादर केला होता. त्यापैकी रुपये १४३ कोटी ९० लाख रुपयांच्या प्रस्तावास उच्चाधिकार समितीने मान्यता दिली.