ताराबाई पार्कातील गोकुळ कार्यालयात गणेशोत्सव साजरा
schedule27 Aug 25 person by visibility 104 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ताराबाई पार्क येथील कार्यालयात गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना पार पडली. प्रतिष्ठापनेनंतर पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा व आरती केली. यावेळी संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष गोरे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अशोक पुणेकर, अशोक पाटील, बाजीराव पाटील, विनोद वानखेडे , सुभाष नाळे, बाळासो वायदंडे, कृष्णात पाटील, प्रथमेश पाटील, नितीन तोडकर, राहुल थोरवडे उपस्थित होते.