शिवसेना किसान सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रा. जालंदर पाटील, सचिवपदी जनार्दन पाटील
schedule28 Aug 25 person by visibility 40 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेना राज्य शेतकरी सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी प्रा. जालंदर गणपती पाटील (राशिवडे बुद्रुक ) यांची निवड करण्यात आली. सचिवपदी जनार्दन पाटील (परिते) यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या मंत्रीमंडळाच्या सदस्यांच्या बैठकीत किसान सेनेची नवी कार्यकारिणी जाहीर केली. प्रा. पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. गेली २५ वर्षेहून अधिक काळ ते शेतकरी चळवळीत सक्रिय आहेत.
दरम्यान शिवसेना किसान सेनेच्या कार्याध्यक्षपदी धनंजय भास्कर जाधव (पुणतांबे, अहिल्यानगर), उपाध्यक्षपदी नाथराव निवृत्तीराव कराड (हिंजेगाव, बीड), रवींद्र बापूसाहेब मोरे (टाकळीमिया, अहिल्यानगर), प्रा. विश्वंभर सोपान बाबर (म्हसवड,सातारा), खजिनदारपदी पद्माकर एकनाथ मोराडे (मसरुळ, नाशिक), सरचिटणीसपदी प्रल्हाद रामजी इंगवले (मालेगाव, नांदेड) यांची निवड झाली.
प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीवर बोलताना प्रा. जालंदर पाटील यांनी, ‘शेतकऱ्यांसाठी आम्ही सातत्याने संघर्ष करत राहिलो. सत्तेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यादृष्टीने प्रयत्न करणार आहे.’‘ या निवडीसाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सदाभाऊ खोत, आमदार राजेश क्षीरसागर यांचे सहकार्य लाभले.