उच्च शिक्षणच्या विभागीय सहसंचालकपदाचा कार्यभार अतिरिक्तच ! सात ठिकाणी नेमणुकीचे आदेश !!
schedule04 Sep 25 person by visibility 427 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे विभागीय सहसंचालकपदी सात अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. उपसचिव अ. शा. मुत्याल यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहेत. दरम्यान कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकपदी डॉ. प्रकाश बच्छाव यांची नियुक्ती झाली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यासंबंधीचा आदेश चार सप्टेंबर २०२५ रोजी काढला. डॉ. बच्छाव यांच्याकडे सध्या कोल्हापूर विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता.
नागपूर येथील शासकीय विज्ञान संस्थेतील सहयोगी प्राध्यापक डॉ. अभय कमलाकर खांबोरकर यांच्याकडे अमरावती उच्च शिक्षण विभागीय सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.संभाजीनगर येथील शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयातील प्रा. डॉ. पंकजा माधव वाघमारे यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर विभागीय सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार दिला. कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमधील प्रा. डॉ. बाबासाहेब दादासाहेब भोसले यांच्याकडे नांदेड विभागीय उच्च शिक्षण विभागीय सहसंचालकपदाचा तर प्रा. डॉ. अजयकुमार गंगाधर जाधव यांच्याकडे सोलापूर विभागीय सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार दिला.अमरावती येथील शासकीय ज्ञान विज्ञान संस्थेतील प्रा. डॉ. किरणकुमार लक्ष्मण बोंदर यांच्याकडे पनवेल विभागीय सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला. मुंबई येथील एलफिन्स्टन कॉलेजमधील प्रा. डॉ. पराग पुरुषोत्तम मसराम यांच्याकडे जळगाव विभागीय सहसंचालकपदाचा तर पुणे येथील विभागीय सहसंचालक कार्यालयातील प्रशासन अधिकारी डॉ. अर्चना सखाराम बोऱ्हाडे यांच्याकडे सहसंचालक (प्रशासन) उच्च शिक्षण संचलनालय पुणे येथील अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. चार सप्टेंबर २०२५ रोजी हे आदेश निघाले आहेत.