Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भुयेवाडीत सर्व रोग निदान शिबिर, आयुष्यमान कार्ड वाटपपालकमंत्र्यांचा उद्योजकांशी संवाद, उद्योगांसाठी जागा- कुशल मनुष्यबळसाठी लवकरच बैठकसत्तर लाखाची अॅडव्हान्स रक्कम संचालकांच्याकडे की कर्मचाऱ्यांकडे ? प्रसाद पाटलांचा सत्ताधाऱ्यांना सवालकॉमर्स कॉलेजची विद्यार्थिनी जागृती चव्हाणची कॅम्पसाठी निवडप्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी बबन केकरेकोल्हापुरात लवकरच आयटी क्षेत्रातील उद्योजकांची परिषद- उद्योगमंत्री उदय सामंतमॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेचे दागिने लुटले, पाचगाव-गिरगाव रोडवरील प्रकारपृथ्वी मोरे-ऋतुजा मोहिते विवाह सोहळा दिमाखात, मान्यवरांची उपस्थितीशहीद महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात, विद्यार्थिनी शिक्षकांच्या भूमिकेत !सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कारभारामुळे शिक्षक बँकेच्या ठेवी घटल्या ! कर्जे कमी झाल्या, बोगस नफा दाखवला !! -विरोधी आघाडीचा आरोप

जाहिरात

 

कोल्हापूर महापालिकेकडून प्रभाग रचना जाहीर ! एक ते १९ प्रभाग चार सदस्यीय, वीस क्रमांकाच्या प्रभागात पाच नगरसेवक !!

schedule03 Sep 25 person by visibility 512 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर महापालिकेने प्रभाग रचना जाहीर केली आहे. एकूण २० प्रभागातून ८१ सदस्य निवडले जातील. एक ते १९ प्रभाग हे चार सदस्यीय आहेत. तर २० नंबरचा प्रभाग हा पाच सदस्यीय आहे. या प्रभाग रचनेवर १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत हरकती मागविल्या आहेत. महापालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या स्वाक्षरीनिशी प्रभाग रचना जाहीर झाली आहे.नागरिकांच्या माहितीसाठी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहासह विभागीय कार्यालयातही प्रभाग रचनेची माहिती पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

कोल्हापुरात पहिल्यांदाच चार सदस्यीय प्रभाग रचना केली आहे.यामुळे आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्ष व उमेदवारांची कसोटी लागणार आहे. प्रभाग रचना उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण दिशा या पद्धतीने केली आहे. चार वॉर्डाचा एक प्रभाग झाल्यामुळे नगरसेवक आता २५ हजारहून अधिक लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.  प्रभाग क्रमांक वीसमध्ये एकूण पाच सदस्य असतील. या प्रभागाची लोकसंख्या ३२ हजार १२१ इतकी आहे. प्रभाग रचना जाहीर करताना त्या प्रभागाची व्याप्ती, एकूण लोकसंख्या, अनुसूचित जमाती व अनुसूचित जातीची लोकसंख्या जाहीर केली आहे.

प्रभाग एकमधील लोकसंख्या २७ हजार ७९१ इतकी आहे. प्रभाग क्रमांक दोनची लोकसंख्या  २५ हजार ७१७ इतकी आहे.  तीनची लोकसंख्या  २५ हजार ३५७ तर प्रभाग सहा मधील लोकसंख्या २५ हजार ३९४ आहे. प्रभाग क्रमांक एकची व्याप्ती गोळीबार मैदान, हुनमान तलाव, कसबा बावडा पॅव्हेलियन मैदान, बिरंजे पाणंद, भगवा चौक, कसबा बावडा पंचगंगा वैकुंठभूमी, आंबेडकरनगर अशी आहे. प्रभाग क्रमांक दोनची व्याप्ती अॅपल सरस्वती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, राजर्षी शाहू कॉलेज, धैर्यप्रसाद हॉल, इनकम टॅक्स ऑफिस, न्यू सर्किट हाऊस, ईएसआय हॉस्पिटल, देवणे कॉलनी,देवार्डे मळा, कदमवाडी-जाधववाडी रोड, भोसलेवाडी, कामगार चाळ, कपूर वसाहत, एमएसईबी सब स्टेशन, मुक्त सैनिक उद्यान, डीवाय पाटील हॉस्पिटल असा आहे.
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes