जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धांना प्रारंभ, ३२६ खेळाडूंचा सहभाग
schedule09 Jul 25 person by visibility 19 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनतर्फे आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धां बुधवारी सुरुवात झाली. असोसिएशनचे अध्यक्ष आणि घाटगे ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर सतीश घाटगे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेसाठी महादेवरावजी रामचंद्र महाडिक फाऊंडेशन यांनी प्रायोजकत्व दिले आहे. स्पर्धा अंबाई डिफेन्स येथील बॅडमिंटन कोर्टवर तेरा जुलैपर्यंत होणार आहेत. या स्पर्धेत एकूण ३२६ खेळाडूंनी भाग घेतला आहे.
उद्घाटनप्रसंगी व्हाईस चेअरमन विनोद भोसले, ट्रेझरर चंद्रशेखर सोवनी, सेक्रेटरी तन्मय करमरकर यांच्यासह सुमित चौगुले, साईदास, जगदीश काणे, अरुणा रसाळ, योगिनी कुलकर्णी, सिद्धार्थ नागावकर आणि अक्षय मनवाडकर यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचे उद्घाटन झाले. दरम्यान पहिल्या दिवशी पंधरा वर्षाखालील मुले या गटातील स्पर्धेत निषाद कुलकर्णी विजयी विरुद्ध सर्वेश शिंदे 15- 5, 15- 3, सर्वज्ञ माने विजयी विरुद्ध ऋतुराज कुंभार 19-17, 15 -3, आराध्य फराकटे विजयी विरुद्ध समरजीत लोंढे 15 -11, 12 -15, 15 -8 , अथर्व कोले विजयविरुद्ध वरद कदम 15- 12, 15 -13, आयुष पाटील विजयविरुद्ध सृजन पाटील 15- 5, 15 -3, स्वर हवळ विजयविरुद्ध पार्थराजे पाटील 15 -5 15- 6 असा निकाल आहे.
पंधरा वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेत श्रद्धा माळुंगेकर विजयी विरुद्ध यशस्वनी पवार 15-5, 15-9 , जुई तोडकर विजयविरुद्ध सिद्धी का सागर 15- 9 , 15 -1 ,वेदांती आंबी विजयी विरुद्ध जानवी माळी 15- 6, 15 -13, सिद्धी पवार विजयी विरुद्ध ऋषिता पाटील 11-15 15-9, 15 -11 असा निकाल आहे. तेरा वर्षाखालील मुले गटातील स्पर्धेत अभिनव तुपे विजयी विरुद्ध हर्ष पाटील 15- 8, 15 -9, अनंत घाटगे विजयविरुद्ध मिहीर जाधव 11-15, 15 -10,15 -9 , आव्हान बाबर विजयी विरुद्ध दिग्विजय रावण 15 -11, 15 -8 , रणवीर पाटील विजयी विरुद्ध प्रणव मोरे 15- 13, 15 -10 असे सामने झाले.