जिल्ह्यातील १४३ शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर संस्काराचे बीजारोपण
schedule09 Jul 25 person by visibility 36 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यातील १४३ माध्यमिक शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर संस्काराचे बीजारोपण करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी दिली . विद्याभवन येथे आयोजित मुख्याध्यापक संघाच्या राजर्षी शाहू सभागृहा मध्ये त्या सहभागी शाळांच्या मुख्याध्यापक मार्गदर्शन सत्रात बोलत होत्या. सावंत म्हणाल्या की बारा ते चौदा या वयोगटातील वाढत चाललेली व्यसनाधीनता ही चिंतेची बाब आहे. यासाठी शाळांमधून पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी उपक्रम राबवण्यात येणार असून यामध्ये आपत्ती व्यवस्थापन, पालक उद्बोधन, फटाकेमुक्तदिवाळी, अनाथाश्रम भेटी, आजी आजोबा मेळावे आदी उपक्रमांचाही समावेश आहे. शिक्षणविस्तार अधिकारी जयश्री जाधव यांनी प्रास्ताविक केले. उपशिक्षणाधिकारी अजय पाटील यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना विद्यार्थी सुरक्षिततेबाबत मौलिक सूचना दिल्या. यावेळी मुख्याध्यापक संघाचे सचिव आर.वाय .पाटील, निशिकांत चव्हाण, मिलिंद पांगिरेकर,एनडीआरएफचे मेजर संदीप पवार, कोरगांवकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे, प्रकाश सुतार उपस्थित होते.