कोल्हापूर महापालिकेतर्फे शहरस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
schedule04 Sep 25 person by visibility 246 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे मनपा शाळा व खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना कोल्हापूर महापालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. शिक्षक दिनाचे औचित्य साधून २०२५ चे पुरस्कार जाहीर झाले आहेत. महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या मान्यतेने उपायुक्त कपिल जगताप यांनी पुरस्कार जाहीर केले.
महापालिका शाळेतील पुरस्कार प्राप्त शिक्षक यादीमध्ये टेंबलाईवाडी विद्यालयातील सहायक शिक्षिका राजमहेंद्री बसगोंडा स्वामी, हिंद विद्यामंदिर सहायक शिक्षिका जयश्री दत्तात्रय पुजारी, लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर येथील सहायक शिक्षक संजयकुमार मारुती देसाई, सहायक शिक्षिका पल्लवी दिगंबर देसाई, बोंद्रेनगर विद्यामंदिर येथील सहायक शिक्षक मनोहर दिनकर बुरुड यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. मनपा शाळा विशेष शिक्षक पुरस्कार जरगनगर विद्यामंदिरातील सहायक शिक्षक श्रीकांत बाबासो हुबाले व डॉ. झाकीर हुसेन ऊर्दू मराठी स्कूलमधील सहायक शिक्षिका तब्बसुम रझाक अत्तार यांना जाहीर झाला. मनपा शाळा आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार पी. बी. साळुंखे विद्यालयातील सेवक महादेव शामराव डाकरे व डॉ. झाकीर हुसेन ऊर्दू मराठी स्कूलमधील सेवक रेहमान मेहताब मणेर यांना जाहीर झाला आहे.
खासगी शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कार प्रिन्स शिवाजी विद्यालय राजारामपुरी येथील सहायक शिक्षिका माधवी मुकुंद शिनगारे, श्रीराम विद्यालय राजारामपुरी येथील सहायक शिक्षक संतोष राजाराम केसरकर, गागी देसाई टोपीवाले विद्यालयातील सहायक शिक्षिक्षक जयश्री सुनीलकुमार बीडकर यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.
दरम्यान महापालिका प्रशासकांच्या सूचनेनुसार शहरस्तरीय आदर्श शिक्षक –शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार निवड समिती स्थापन केली होती. या समितीत उपायुक्त कपिल जगताप, डाएटचे अधिव्याख्यात्या डॉ. वैशाली भोई, दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, प्राथमिक शिक्षण समितीचे प्रभारी प्रशासनाधिकारी डी.सी.कुंभार, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी यांचा समावेश होता. प्रस्ताव सादर केलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मुलाखती झाल्या. त्यानंतर गुणदान निश्चित करुन पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे घोषित केली.