Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गणेशोत्सव कामासाठी महापालिकेकडून कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या ! शिक्षकांनी टाकला कामावर बहिष्कार !!कोल्हापुरातील डॉक्टर कुटुंबीयांची ४२ लाखाची आर्थिक फसवणूककोल्हापूरच्या क्रीडाक्षेत्राच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्यासोबत संयुक्त बैठक-प्रकाश आबिटकररविवारपासून दैनंदिन पाणी पुरवठा ! महापालिकेडून नियोजन सुरू !!कॉसमॉसचे अध्यक्ष मिलिंद काळेना यंदाचा डॉ. डी वाय पाटील जीवनगौरव पुरस्कारगोकुळतर्फे गाय- म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयांनी वाढवारणा स्कूल ऑफ लॉमध्ये प्रवेशाची विद्यार्थ्यांना संधीदाखल्याप्रकरणी तीन शाळांना कारणे दाखवा नोटीस ! विद्यार्थी आंबेवाडीतील शाळेत,  दाखले कोल्हापूर-शाहूवाडीतील शाळेत !!अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी पहिल्या टप्प्यातील १४३ कोटींच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यतात्यांच्या-आमच्या मनातील शंका बोलत बसलो तर मतभेद वाढतील,  महाडिकांच्या प्रश्नांचे निरसन गोकुळचे संचालक मंडळ करेल : मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

मुख्यमंत्री ठरेना, नावांची यादी थांबेना ! मुरलीधर मोहोळांचे नाव चर्चेत !!

schedule29 Nov 24 person by visibility 280 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत बहुमत मिळाले. सर्वाधिक 132 जागा जिंकत भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष ठरला. स्पष्ट बहुमत असतानाही अद्याप मुख्यमंत्रीपदाचा नेमका उमेदवार कोण हे अधिकृतपणे जाहीर झाले नाही. देवेंद्र फडणवीस हे प्रबळ दावेदार समजले जात असताना भारतीय जनता पक्षाच्या वर्तुळात विविध नावाभोवती चर्चा सुरू आहे. सुधीर मुनगुंटीवार, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, आशिष शेलार यांच्या पाठोपाठ मराठी चेहरा म्हणून खासदार मुरलीधर मोहोळ यांचे नाव चर्चेत आले आहे. याशिवाय पंकजा मुंडे यांच्याकडे ओबीसी चेहरा म्हणून पाहिले जात आहे.
 महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदी कोण हे अद्याप जाहीर झाले नाही. मुंबईत आणि दिल्लीत चर्चेच्या फेऱ्या झाल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यासोबत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची चर्चा झाली. कोणत्या पक्षाला कोणती खाती मिळणार, मंत्रिमंडळातील संख्या यासंबंधी चर्चा झाली. मात्र मुख्यमंत्रीपदी नेमके कोण हे  जाहीर करण्यात आले नाही. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पाहिले जात आहे. 2014 ते 2019 या कालावधीत ते मुख्यमंत्री होते. तसेच गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत महायुतीत उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे. भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्मुला ठरला आहे
 मुख्यमंत्रीपदासंदर्भात नाव जाहीर होण्यास विलंब होत असल्यामुळे रोज नवीन नावे समोर येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रभागी आहे. मात्र भाजपामध्ये धक्कातंत्रांचा अवलंब केला जातो हे यापूर्वी वेगवेगळ्या राज्याच्या मुख्यमंत्री निवडीवेळी दिसून आले आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील यांच्या पाठोपाठ आता पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचे नाव सुद्धा मराठी चेहरा म्हणून समोर येत आहे. पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मोहोळ यांच्याकडे केंद्रामध्ये राजमंत्रीपदाची जबाबदारी सोपविले आहे. ते राज्यातील आणि दिल्लीतील वरिष्ठ नेत्याना जवळचे आहेत.
स्पष्ट बहुमत असतानाही सरकार बनवायला आणि मुख्यमंत्री ठरवायला उशिरा होत असल्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार याविषयी उत्कंठा वाढत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes