जिल्ह्यातील सरपंच-ग्रामविकास अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा
schedule27 Dec 24 person by visibility 33 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : यशवंत चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या माध्यमातून राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानातून जिल्ह्यातील सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांचा मध्य प्रदेशमधील इंदोर येथे अभ्यास दौरा झाला. या अभ्यास दौ-यामध्ये इंदोर महापालिका व देव गोरडिया, तिल्लोरखुर्द, डेंडिया, बांक, कल्लिबिलोद, सिंहासिया-कलारिया या ग्रामपंचायतीने घनकचरा विल्हेवाट, सोलर सिस्टिम, बचत गट अंतर्गत केलेले कामाची पाहणी केली.
पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक श्रीमती माधुरी परीट, पंचायत समिती कागलचे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, विस्तार अधिकारी (पंचायत) नारायण राम्मणा, ग्रामपंचायत कौलगे सरंपच भाउ धोंडीबा कांबळे, ग्रामपंचायत पिंपळगाव बुद्रूकचे सरपंच बंडेराव सुर्यवंशी, ग्रामपंचायत कसबा तारळेचे सरपंच विमल रविंद्र पाटील, ग्रामपंचायत निगवे दुमाला सरंपच रुपाली अर्जुन पाटील, ग्रामपंचायत पुलाची शिरोली येथील सरंपच पदमजा करपे, ग्रामपंचायत सरोळी येथील सरंपच प्रज्ञा प्रविण पाटील, ग्रामपंचायत जांबरे सरंपच विश्नु विश्राम गावडे, ग्रामपंचायत पुलाची शिरोली ग्राम विकास अधिकारी आंनदा यशवंत कदम, ग्राम विकास अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर सचिन शिरदवाडे, ग्रामपंचायत निगवे दुमाला येथील ग्रामविकास अधिकारी संजय शिंदे हे या इंदोर अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते.
.............
“ अभ्यास दौ-यात इंदोर जिल्हयातील ग्रामपंचायतींनी कचरा विलगीकरणाचे काम चांगल्या प्रकारे केले आहे. प्लास्टीक कचरा प्रक्रिया केंद्र ग्रामपंचायतीं मार्फत चालवले जात आहेत तसेच स्वच्छता कराची आकारणी करुन, ग्रामपंचायतींनी बचत गटांच्या महिला व सामाजिक संस्था यांचे सहकार्य घेतले आहे. इंदोर भागातील ग्रामपंचायतींनी केलेले काम निश्चित प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणारे आहेत. या कामाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न सहभागी झालेल्या सरपंच, ग्रामपंचायतीने करावे.”
- माधुरी परीट, प्रकल्प संचालक पाणी व स्वच्छता मिशन