Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोजिमाशिच्या चेअरमनपदी राजाराम शिंदे, व्हाईस चेअरमनपदी शरद तावदारेगोकुळश्री स्पर्धेच्या बक्षीस रकमेत वाढ, दूध वाढीसाठी प्रोत्साहनसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये खादी ग्रामोद्योग मार्गदर्शन कार्यक्रमवास्तव्य कोल्हापुरातच, बिले टूर्स-हॉटेलची ! गाडी डिझेलवर चालणारी-बिल पेट्रोलचे !!विद्यापीठ फंडाचा वापर अॅडव्हान्स सॅलरीसाठी की विकासकामासाठी ? सिनेटमध्ये सदस्यांचा प्रशासनाला खडा सवालडिपार्टमेंटला विद्यार्थीच नसतील तर विद्यापीठ चालणार कसे ? सिनेटच्या प्रश्नोत्तर तासात सदस्यांकडून प्रशासनाची हजेरी !!गोकुळ २०२५ दिनदर्शिकेचे प्रकाशनसीए परीक्षेत कोल्हापूर विभागातून २१ विद्यार्थी उत्तीर्ण ! आयुष पंडित प्रथम, आशिष कारीर दुसऱ्या क्रमांकांने उत्तीर्ण !!मंत्री चंद्रकांत पाटील रविवारी कोल्हापुरात ! भाजपतर्फे जल्लोषी स्वागत होणार !!जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन रद्द

जाहिरात

 

गोकुळश्री स्पर्धेच्या बक्षीस रकमेत वाढ, दूध वाढीसाठी प्रोत्साहन

schedule28 Dec 24 person by visibility 28 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या वतीने दूध उत्‍पादन वाढीसाठी व उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देण्यासाठी आयोजित गोकुळश्री स्पर्धेतंर्गत म्हैस गटातील विजेत्या दूध उत्पादकांच्या बक्षीस रकमेत वाढ केली आहे. तसेच यावर्षीपासून म्हैस दूध वाढीसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून एकूण बक्षीस रक्कमेत १५ हजार रुपयांनी  वाढ केली आहे. गोकुळतर्फे ३१ वर्षापासून या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.

दरम्यान २०२४-२५ मध्‍ये घेण्‍यात  स्‍पर्धेमध्‍ये एकूण ९३ म्‍हैस व गाय दूध उत्‍पादकांनी सहभाग घेतला होता.  या स्पर्धेत श्री जोतिर्लिंग सह. दूध व्‍यावसायिक संस्‍था लिंगनूर कसबा नूल  संस्थेचे शुभम कृष्णा मोरे यांच्‍या मालकीच्या मुऱ्हा जातीच्या म्‍हैशीने एका दिवसात सकाळ व सांयकाळी मिळून १९ लिटर ७३० मि.ली. इतके दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला. श्री जनसेवा सह. दूध व्‍याव. संस्‍था दुधगंगानगर, कसबा सांगाव  संस्थेचे गाय संकेत किरण चौगले यांच्‍या मालकीच्या  एच.एफ जातीच्या गायीने सकाळ व सांयकाळ पाळीमध्ये एकूण ४२ लिटर ३०५ मि.ली. दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला.

स्पर्धेमुळे दूध उत्पादन वाढीबरोबरच गुणवत्तेमध्ये सुधारणा होण्यास मदत होते. तसेच या स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व दूध उत्पादक व विजेत्या दूध उत्‍पादक अभिनंदनास पात्र असून पुढील वर्षी जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी गोकुळश्रीस्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले आहे. दूध उत्पादकांचा या स्पर्धेतील वाढता सहभाग पाहता गोकुळच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादक आपल्या जनावरांतील उत्पादन क्षमता वाढीसाठी प्रयत्नशील असल्‍याचे दिसून येते असे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी नमूद केले.

बक्षीस रकमेत वाढ केल्यामुळे म्हैस गटात पहिल्या क्रमांकांच्या विजेत्यांना ३५ हजार, द्वितीय क्रमांकांना ३० हजार तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना २५ हजार रुपये मिळणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes