मंत्री चंद्रकांत पाटील रविवारी कोल्हापुरात ! भाजपतर्फे जल्लोषी स्वागत होणार !!
schedule27 Dec 24 person by visibility 77 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे रविवारी (२९ डिसेंबर २०२४ ) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर पाटील हे पहिल्यांदाच कोल्हापूरला येत आहेत. भारतीय जनता पक्षातर्फे रविवारी सकाळी सहा वाजता रेल्वे स्टेशन येथे मंत्री पाटील यांचे जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे.
रेल्वे स्टेशन येथील स्वागतानंतर दिवसभरातील नियोजित दौऱ्यानंतर मंत्री पाटील हे सायंकाळी ६ ते ८ यावेळेत भाजपा जिल्हा कार्यालय, नागाळा पार्क याठिकाणी उपस्थित राहून शुभेच्छा स्विकारणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले आहे.
दरम्यान मंत्री पाटील यांचा दोन दिवसाचा कोल्हापूर दौरा आहे. रविवारी ते संभाजीनगर येथील निवासस्थानी असतील. सायंकाळी सहा वाजता नागाळा पार्क येथील भाजपा कार्यालयात शुभेच्छा स्वीकारणार आहेत. मंत्री पाटील हे सोमवारी, ३० डिसेंबर रोजी सकाळी जोतिबा दर्शनासाठी जाणार आहेत. सात वाजून चाळीस मिनिटे ते आठ वाजून वीस मिनिटापर्यंत जोतिबा मंदिर दर्शन झाल्यानंतर ते कोल्हापूरला रवाना होतील. सकाळी ९ वाजता करवीर निवासिनी अंबाबाईदेवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते संभाजीनगर येथील निवासस्थानी परतणार आहेत. सकाळी ११ वाजता खानापूरकडे रवाना होतील.दुपारी तीन वाजता ते गारगोटी, आंबोली मार्गे पणजीकडे रवाना होणार आहेत.