गोकुळ २०२५ दिनदर्शिकेचे प्रकाशन
schedule27 Dec 24 person by visibility 29 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत २०२५ या नवीन वर्षाच्या गोकुळ दिनदर्शिकेचे प्रकाशन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते झाले. संघाच्या प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव येथे हा कार्यक्रम झाला.
गेल्या चार वर्षांपासून या दिनदर्शिकेमध्ये गोकुळमार्फत दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती तसेच गोकुळ सौर ऊर्जा प्रकल्प, हर्बल पशुपूरक उत्पादने, मायक्रोट्रेनिंग सेंटर, गोचिड निर्मुलन आणि थायलेरीया लसीकरण, वासरू संगोपन, जातिवंत म्हैस विक्री केंद्र, बायोगॅस, वंध्यत्व निवारण शिबिरे, महालक्ष्मी मिनरल मिक्श्चर, कोहिनूर डायमंड, गोकुळ दुग्ध उत्पादने, तसेच दूध उत्पादकांना उत्तेजना देण्यासाठी चेअरमन आपल्या गोठ्यावर या सर्व विषयावर प्रबोधनात्मक माहिती या दिनदर्शिकेत आहे.
चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले, गोकुळ दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर मांडलेल्या विषयाची अधिक माहिती कायमस्वरूपी संग्रही ठेवायची झाल्यास प्रत्येक पानावरील क्यू.आर. कोड देण्यात आला आहे. हा कोड आपल्या स्मार्ट फोनने स्कॅन केल्यानंतर त्या विषयाचा लिखित तपशील आणि व्हिडीओ दूध उत्पादकास बघता येईल. या माहितीचा उपयोग नित्यनेमाने किंवा गरजेनुसार करणे दूध उत्पादकास सहज सोपे होणार आहे असे मनोगत व्यक्त केले. या दिनदर्शिका संघाशी संलग्न सर्व प्राथमिक दूध संस्थाना देण्यात येणार आहेत.
याप्रसंगी संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले उपस्थित होते.