संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये खादी ग्रामोद्योग मार्गदर्शन कार्यक्रम
schedule28 Dec 24 person by visibility 19 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांना “स्वयंरोजगार आत्मनिर्भर, उद्योजकता विकास, विविध कौशल्य विकास प्रशिक्षण जनजागृती मार्गदर्शन कार्यक्रम झाला. मार्गदर्शक उमाकांत डोईफोडे यांनी विद्यार्थ्यांना विविध खादी आणि ग्रामोद्योग संस्थेच्या योजनांची माहिती दिली. लघुउद्योग निर्मिती त्यासाठी आवश्यक शासनाचे साह्य पीटीए कौशल्य विकास प्रशिक्षण संबंधी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे यांनी कौशल्य विकास आणि उद्योजकता विकासाचे सुरु असलेले विविध प्रशिक्षण, प्रशिक्षणाची निवड करण्याची पद्धती, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्रावर मिळणारे फायदे यासंबंधी माहिती दिली.
इंजीनियरिंग डिग्री सिव्हिल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डी. आर. पाटील, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अजय बी कोंगे, आयटीआय विभागाचे गटनिदेशक, प्रा. अविनाश पाटील, इन्स्टिट्यूट मधील आणि बाहेरील नोकरी व्यवसाय करू इच्छिणारे विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. सुजित मोहिते यांनी आभा मानले. हा कार्यक्रम संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट. व्ही. गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.