Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळश्री स्पर्धेच्या बक्षीस रकमेत वाढ, दूध वाढीसाठी प्रोत्साहनसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये खादी ग्रामोद्योग मार्गदर्शन कार्यक्रमवास्तव्य कोल्हापुरातच, बिले टूर्स-हॉटेलची ! गाडी डिझेलवर चालणारी-बिल पेट्रोलचे !!विद्यापीठ फंडाचा वापर अॅडव्हान्स सॅलरीसाठी की विकासकामासाठी ? सिनेटमध्ये सदस्यांचा प्रशासनाला खडा सवालडिपार्टमेंटला विद्यार्थीच नसतील तर विद्यापीठ चालणार कसे ? सिनेटच्या प्रश्नोत्तर तासात सदस्यांकडून प्रशासनाची हजेरी !!गोकुळ २०२५ दिनदर्शिकेचे प्रकाशनसीए परीक्षेत कोल्हापूर विभागातून २१ विद्यार्थी उत्तीर्ण ! आयुष पंडित प्रथम, आशिष कारीर दुसऱ्या क्रमांकांने उत्तीर्ण !!मंत्री चंद्रकांत पाटील रविवारी कोल्हापुरात ! भाजपतर्फे जल्लोषी स्वागत होणार !!जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन रद्दआपवर आरोप करणारा टिप्पर चालक हा ठेकेदाराचा मावसभाऊ ! महापालिकेतील कारभारीही समोर आणणार

जाहिरात

 

डिपार्टमेंटला विद्यार्थीच नसतील तर विद्यापीठ चालणार कसे ? सिनेटच्या प्रश्नोत्तर तासात सदस्यांकडून प्रशासनाची हजेरी !!

schedule27 Dec 24 person by visibility 304 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विविध अधिविभागातील विद्यार्थ्यांच्या घटत्या संख्येवरुन सिनेटमधील प्रश्नोत्तराचा तास गाजला. अधिसभा सदस्यांनी, विद्यार्थी संख्या का कमी झाली, गेल्या दहा वर्षातील सदस्यांनी उपस्थित आकडेवारी आणि प्रस्तावित उपाययोजनावरुन प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार केला. या महत्वाच्या प्रश्नावर प्रशासनाला समाधानकार उत्तर न देता आल्यामुळे सदस्य आक्रमक बनले. विद्यार्थीच नसतील तर विद्यापीठ चालणार कसे ? या गंभीर प्रश्नावर प्रशासनाकडून चेष्टा करणारे उत्तर दिले जात आहे अशा शब्दांत संताप व्यक्त केला. सभाध्यक्ष व कुलगुरू डी. टी. शिर्के यांनी विद्यार्थ्यांची संख्या घटू नये, शैक्षणिक गुणवत्ता यासंबंधी प्रशासन गंभीर असून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

गेल्या काही वर्षात विद्यापीठातील विविध विभागातील विद्यार्थी प्रवेश क्षमता शंभर टक्के पूर्ण होत नाही. लौकिक असलेल्या विभागातही विद्यार्थी संख्या कमी होऊ लागली आहे. या महत्वाच्या विषयाकडे सिनेट सदस्य अभिषेक मिठारी यांनी लक्ष वेधले. त्यांनी २०१४ ते २०२४ या कालावधीतील प्रत्येक विभागातील उपलब्ध संख्या, प्रवेशित विद्यार्थी संख्या यासंबंधी विचारणा केली. यावर प्रशासनाकडून बोलताना व्यवस्थापन परिषद सदस्य व्ही. एम. पाटील यांनी विद्यार्थ्याच्या घटत्या संख्या आणि करावयाच्या उपाययोजना यासबंधी समितीची स्थापना केली आहे. या समितीने रिपोर्ट दिला आहे. स्वतंत्र सूचना केल्या आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून उपाययोजना होईल असे उत्तर दिले.

यावर सदस्य मिठारी यांनी प्रत्येक विभागनिहाय आकडेवारी मागितल असताना दुसरेच उत्तर का दिले जाते ? प्रशासनाकडे आकडेवारी नाही की विषयाचे गांभीर्य नाही असा सवाल करत कोंडी केली. यावर कुलगुरू शिर्के यांनी सगळी आकडेवारी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे सांगितले.  सिनेट सदस्य प्रा. शशिभूषण महाडिक यांनी पीजी विभागाच्या कामकाजासंबंधी प्रश्न उपस्थित केला. प्रा. डी. एन पाटील यांनी विनाअनुदानित कॉलेजिअसची संख्या वाढल्यामुळे अनुदानित कॉलेजसमोर विद्यार्थी संख्येचा प्रश्न निर्माण झाला आहे का ? याकडे लक्ष वेधले. प्रा. प्रकाश कुंभार, अर्चना कोलेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला.

सिनेट सदस्य श्वेता परुळेकर यांनी विद्यापीठातर्फे खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या ट्रॅकसूटचा रंग, खेळाडूंना दिली जाणारी सहभाग प्रमाणपत्रे याविषयी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावरील चर्चेत श्रीनिवास गायकवाड, विष्णू खाडे यांनीही सहभाग घेतला. व्यवस्थापन परिषद सदस्य रघुनाथ ढमकले यांनी उत्तर देत नियमाला अनुसरुन व समितीची मान्यता घेऊनच ट्रॅकसूटच्या रंगसंगतीत बदल केला आहे असे उत्तर दिले. स्पर्धा संपल्यानंतर खेळाडूंना तत्काळ सहभाग प्रमाणपत्र देण्याविषयी प्रशासन सकारात्मक असल्याचे सांगितले. दरम्यान ट्रॅकसूटचा रंग, दर्जा यावर चर्चा करताना सदस्यांनी सभागृहापुढे ट्रॅकसूट सादर करावेत अशी मागणी केली. प्रशासनाकडून जुने व नवे ट्रॅक सूट दाखवित खेळाडूंच्या मागणीनुसार बदल केल्याचे पटवून दिले. जुने ट्रकसूट ८७० रुपयेला तर नवा ट्रकसूट ८४३ रुपयेला उपलब्ध होत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. प्रकुलगुरू पी. एस. पाटील, कुलसचिव व्ही.एन. शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अधिसभा झाली. ३२ प्रश्नापैकी केवळ पाच प्रश्नावर चर्चा झाली.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes