सीए परीक्षेत कोल्हापूर विभागातून २१ विद्यार्थी उत्तीर्ण ! आयुष पंडित प्रथम, आशिष कारीर दुसऱ्या क्रमांकांने उत्तीर्ण !!
schedule27 Dec 24 person by visibility 223 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट्स कोर्सच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या या परीक्षेस कोल्हापूरमधून २८२ विद्यार्थी बसले होते. यामधून २१ विद्यार्थी सीए झाले. यापैकी कोल्हापूर विभागातून आयुष प्रशांत पंडित यांनी प्रथम क्रमांक तर आशिष दर्शनलाल कारीर यांनी दुसरा क्रमांक मिळवला.
कोल्हापूर विभागातून हितेश सुभाष गावित, जयंत नागोजी गोरुले, नम्रता प्रकाश सुर्वे, हिमांशू सुधीर जवळकर ,आदित्य अविनाश पेंडुरकर, विरेश मल्लिकार्जुन कोळकी, मोनिश सुरेश, स्वरूप संजय मिरजकर, सिद्धेश सागर मोहोळकर, आकाश विलास कातकर, युगंधरा यशवंत पागे, प्राची तेजमल संघवी, आशना विजय वच्छाणी, शिवांजली भूपतसिंह शिंदे, शिवकुमार विजय कोवाडे, निकिता दीपक पाटील , मोक्षा मनोज शाह, समृद्धी सरदेसाई आणि प्रणाली गजानन बकरे हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोर्स बद्दल अधिक माहिती साठी दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया चे कोल्हापूर शाखेचे ऑफिस आयसीएआय भवन, दाभोळकर कॉर्नर येथे संपर्क साधू शकता असे आवाहन कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष सीए तस्लीमआरिफ मुल्लाणी यांनी केले आहे.