Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भुयेवाडीत सर्व रोग निदान शिबिर, आयुष्यमान कार्ड वाटपपालकमंत्र्यांचा उद्योजकांशी संवाद, उद्योगांसाठी जागा- कुशल मनुष्यबळसाठी लवकरच बैठकसत्तर लाखाची अॅडव्हान्स रक्कम संचालकांच्याकडे की कर्मचाऱ्यांकडे ? प्रसाद पाटलांचा सत्ताधाऱ्यांना सवालकॉमर्स कॉलेजची विद्यार्थिनी जागृती चव्हाणची कॅम्पसाठी निवडप्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी बबन केकरेकोल्हापुरात लवकरच आयटी क्षेत्रातील उद्योजकांची परिषद- उद्योगमंत्री उदय सामंतमॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेचे दागिने लुटले, पाचगाव-गिरगाव रोडवरील प्रकारपृथ्वी मोरे-ऋतुजा मोहिते विवाह सोहळा दिमाखात, मान्यवरांची उपस्थितीशहीद महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात, विद्यार्थिनी शिक्षकांच्या भूमिकेत !सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कारभारामुळे शिक्षक बँकेच्या ठेवी घटल्या ! कर्जे कमी झाल्या, बोगस नफा दाखवला !! -विरोधी आघाडीचा आरोप

जाहिरात

 

देशातील आघाडीच्या पन्नास विद्यापीठात शिवाजी विद्यापीठ !

schedule04 Sep 25 person by visibility 1035 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ-२०२५) मध्ये शिवाजी विद्यापीठाने देशातील आघाडीच्या २०० विद्यापीठांमध्ये आपले स्थान कायम राखत असताना राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या यादीत आगेकूच करीत देशातील आघाडीच्या ५० विद्यापीठांमध्ये स्थान प्राप्त केले आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी ही माहिती दिली.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२५ साठीची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्कची क्रमवारी जाहीर केली. २०१६ पासून ही क्रमवारी जाहीर करण्यात येत आहे. पहिल्या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ या क्रमवारीत देशातील आघाडीच्या २०० विद्यापीठांमध्ये आपले स्थान कायम राखत आले आहे. रँकिंगमध्ये सहभागी होणाऱ्या शैक्षणिक संस्थांची संख्या वर्षागणिक वाढत जात असतानाही शिवाजी विद्यापीठाने आपले स्थान कायम राखले, हे महत्त्वाचे आहे. या वर्षीही १५१-२०० या रँकबँडमध्ये शिवाजी विद्यापीठाचे स्थान कायम आहे. गतवर्षीपासून एनआयआरएफने राज्य सार्वजनिक विद्यापीठांची क्रमवारी स्वतंत्रपणे जाहीर करण्यास सुरवात केली. त्यानुसार गेल्या वर्षी शिवाजी विद्यापीठाचा या यादीमध्ये ५१-१०० या रँकबँडमध्ये समावेश झालेला होता. यंदा शिवाजी विद्यापीठाने क्रमवारीत आणखी आगेकूच करीत १-५० या रँकबँडमध्ये स्थान प्राप्त केले आहे. देशातील आघाडीच्या ५० विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठ आता ५१.८० गुणांकनासह ४५ व्या स्थानी पोहोचले आहे. या यादीत महाराष्ट्रातील आणखी ३ विद्यापीठे आहेत. त्यात ११ व्या स्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, १२ व्या स्थानी मुंबई विद्यापीठ आणि ४३ व्या स्थानी पुण्याचे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आहे.

 

........................................................

राष्ट्रीय पातळीवरील या क्रमवारीमध्ये राज्य सार्वजनिक विद्यापीठांत शिवाजी विद्यापीठाने मोठी झेप घेऊन राष्ट्रीय स्तरावर अभिमानास्पद कामगिरी नोंदविलेली आहे. सहभागी होणाऱ्या समग्र शैक्षणिक संस्थांची संख्या वाढती असतानाही शिवाजी विद्यापीठाचे या क्रमवारीतील स्थान उंचावले आहे. गेल्या काही वर्षांत एनआयआरएफच्या निकषांनुसार विद्यापीठातील शिक्षक, संशोधकांसह सर्वच घटकांनी आपली कामगिरी उंचावण्यासाठी परिश्रम घेतले, त्याचे हे फलित आहे. या सर्वच घटकांचे मी अभिनंदन करतो. भविष्यातही त्यांनी शिवाजी विद्यापीठाचे स्थान आणि यशाची कमान अधिकाधिक उंचावत नेण्यासाठी प्रयत्नशील राहावे.”

-डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes