कोल्हापूर दक्षिणमध्ये शिवसेनेचे सदस्य नोंदणी अभियान
schedule27 Jun 25 person by visibility 76 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरामध्ये शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे. कोल्हापुरात देखील सदर अभियान राबवण्यात येत असून आज कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पंधरा हजारहून अधिक सदस्यांचे नोंदणी अर्ज आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी जमा केले. आमदार क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली या अभियानाची घोषणा होताच कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेक नागरिकांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची संपर्क साधून स्वयंस्फूर्तीने सदस्य नोंदणी अर्ज भरले आज सदर सदस्य नोंदणी अर्ज आमदार क्षीरसागर यांच्याकडे सोपवण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख रमेश खाडे, महानगर समन्वयक कमलाकर जगदाळे, वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रशांत साळुंखे, महिला आघाडी शहर प्रमुख सौ. अमरजा पाटील, उपशहर प्रमुख सुरेश माने, फेरीवाला संघटना शहर प्रमुख विजय जाधव, महिला आघाडी उपशहर प्रमुख प्रीती अतिग्रे, राधिका पारखे, पूजा आरदांडे, सना अत्तार, फिरोज अत्तार आदी उपस्थित होते.