अभाविप
schedule23 Dec 22 person by visibility 62 category
कोल्हापूर : "जेथे जेथे विद्यार्थी आहे, तिथे तिथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यरत असेल" असा विश्वास अभाविपचे प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५७ वे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशच्या तीन दिवसीय अधिवेशनाला शुक्रवारी सुरुवात झाली.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (२३ डिसेंबर) प्रदेश अध्यक्ष व प्रदेश मंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षीय मनोगत मांडत असताना प्रदेश अध्यक्ष प्रा. निर्भयकुमार विसपुते यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या विद्यार्थी परिषदेच्या कार्यांची माहिती उपस्थितांना सांगितली. अभाविपचे अमृत महोत्सवी वर्ष आपण सर्वजण अतिशय उत्साहाने साजरा करीत आहोत. अनिल ठोंबरे म्हणाले, " बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली अशा छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व संघर्षाच्या लढ्याच्या प्रतिनिधित्वाची साक्ष देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात ५७ वे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन होत आहे " याचा मला विशेष आनंद असल्याचे प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी सांगितले.
या अधिवेशनात वर्ष २०२२ - २०२३ ची नविन कार्यकारिणी घोषित करण्यात येणार आहे. आज या नविन वर्षासाठी पुननिर्वाचित घोषित झालेल्या प्रदेश अध्यक्ष प्रा. निर्भयकुमार विसपुते व प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी त्यांचा पदभार स्विकारला.
G20 : विश्वपटल पर भारत या विषयावर अभाविप चे क्षेत्रीय सहसंघटन मंत्री राय सिंह यांनी सर्व विद्यार्थ्यांना संबोधित केले. भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे. तर पुढील अमृत काळामध्ये तरूणांची भुमिका ही महत्वाची राहणार आहे. असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. येत्या काही वर्षांत भारतात देशा बाहेरून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, हाच दूर दृष्टीकोन ठेवून विद्यार्थी परिषदेने वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंट्स अँड युथ या गतिविधी ची स्थापना केली होती. मी, माझ गाव, माझ शहर इतकाच विचार न करता जागतिक पातळीवरचा विचार करण्याची गरज आहे असे आवाहन त्यांनी तरूणांना केले.