शहाजी छत्रपती महाविद्यालयाचा बारावी निकाल ८२.५४ टक्के
schedule05 May 25 person by visibility 663 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचा बारावी निकाल ८२.५४ टक्के लागला. यामध्ये वाणिज्य शाखा ८६.६९ टक्के, कला शाखेचा ७७.२९टक्के निकाल लागला. वाणिज्य शाखेत धनश्री मारुती मोरेने ८८.१७ टक्के गुण मिळवून प्रथम तर कला शाखेत ज्योती दादासो चव्हाण ७९ टक्के गुण मिळवून प्रथम आली. महाविद्यालयाचा निकाल पुढीलप्रमाणे कला शाखा - रागिनी अशोक आवळे ७६ टक्के, द्वितीय - शारदा अरविंद चौगले ७४.५० टक्के, तृतीय क्रमांक - श्रावणी सुरेश सावंत ७२ टक्के मिळवले आहेत. वाणिज्य शाखेत - आदित्य अनिल बनसोडेने ८३.८७ टक्के गुण मिळवत प्रथम तर ऋतिका शहाजी हुंबेने ७६.६७ टक्के गुणासह द्वितीय क्रमांक मिळवला. रोहन संजय खेतालने ७४.५०टक्के गुण मिळवले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, मानद सचिव श्रीमती संगीता विजयसिंह बोंद्रे, प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, पर्यवेक्षक प्रा. पी. के. पाटील व सर्व प्राध्यापकांचे प्रोत्साहन लाभले.