नेहरू हायस्कूल- ज्युनिअर कॉलेजचा विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के
schedule05 May 25 person by visibility 36 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर, संचलित नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला. तसेच कला शाखेचा निकाल ८१ टक्के लागला. विज्ञान शाखा प्रथम क्रमांक फौजान मो. जिलानी शेख (७७ टक्के), द्वितीय क्रमांक - शेख शुरैम समीर (७६.६७ टक्के) तृतीय क्रमांक - कुमारी मुल्ला शिफनाज समीर (७०.५० टक्के) यांनी पटकाविला. कला शाखा प्रथम क्रमांक - साबिया महमद हनीफ बागवान ( ७२.३३ टक्के), द्वितीय- जिया रियाज पत्रेवाले (६८.५० टक्के) तृतीय- सुमैय्या जैनुद्दीन सनदि ( ८५.८३ टक्के ) यांनी मिळवला आहे. सर्व यशस्वी विध्यार्थ्याचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक हाजी कादर मलबारी, उपाध्यक्ष आदिल फरास, शालेय समिती चेअरमन रफिक शेख, सदस्य हाजी लियाकत मुजावर, अल्ताफ झांजी, रफिक मुल्ला, फारुक पटवेगार, हाजी जहांगिर अत्तार, हाजी पापा बागवान, मलिक बागवान यांनी केले. विध्यार्थ्यांना मुख्याध्यापक
एम.एम ताशिलदार व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.