भाजपा स्थापनादिनानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान
schedule07 Apr 25 person by visibility 65 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी स्थापनादिनाचे औचित्य साधून भाजपा कपिलतीर्थ शक्ती केंद्राच्या वतीने जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम झाला. सहा एप्रिल हा भाजपाचा स्थापना दिन आहे.
जनसंघाच्या स्थापनेपासून पक्षात कार्यतर असलेले भाऊसाहेब गणपुले, अशोक कोळवणकर, दिलीप मैत्राणी, अशोकराव लोहार, केशव स्वामी, किशोरी स्वामी यांचा यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकरणी सदस्य संदीप देसाई आणि माजी नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच बूथ अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ओंकार गोसावी, संजय फलटणकर, राजेंद्र सासने यांना भाऊसाहेब गणपुलेंच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या. संजय फलटणकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास बाबूराव ठाणेकर, अजय पाठक, जयंत गोयाणी, प्रमोद जोशी, गिरीजा फलटणकर, दिपा ठाणेकर, रेखा मेंदरकर, अनिल शिंदे, अनिष पोतदार, वरद देशिंगे, अशोक जैन, मधुसुधन जोशी, संदेश कातवरे, संतोष जोशी आदी उपस्थित होते.