शिवनेरीनगर मित्र मंडळतर्फे हनुमान जन्मोत्सवानिमित्ति विविध कार्यक्रम
schedule09 Apr 25 person by visibility 83 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पाचगाव, शांतीनगर भागातील शिवनेरीनगर मित्र मंडळतर्फे हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या सोहळयातंर्गत ९ एप्रिल ते १३ एप्रिल २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रम होणार आहेत.
बुधवारी, (९ एप्रिल) सायंकाळी पाच वाजता मूर्तीची मिरवणूक व नगरप्रदक्षिणा आहे. गुरुवारी, दहा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता प्राणप्रतिष्ठापना व होम विधी होईल. रात्री आठ वाजता श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक भजनी मंडळ वडणगेतर्फे भजनाचा कार्यक्रम आहे. शुक्रवारी सकाळी, ११ वाजता शांतीनगर अंगणवाडी येथे रक्तदान शिबिर आहे. सायंकाळी चार वाजता भैरवी महिला भजनी मंडळ, शांतीनगरचा भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री आठ वाजता शाहीर बंडा भोसले (मलकापूर) व शाहीर बाळू चौगले (पणुरे) यांचा भेदिक शाहिरीचा कार्यक्रम आहे.
शनिवारी, बारा एप्रिल रोजी हनुमान मंदिर येथे अभिषेक, तसेच कळंबा येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम आहे. सकाळी सहा वाजता जन्मोत्सव सोहळा आहे. सायंकाळी चार वाजता विठठल-रुक्मिणी भजनी मंडळ, समृद्धीनगरचा भजनाचा कार्यक्रम आहे. रात्री आठ वाजता निवेदक विशाल बेलवलकर लिखित होम मिनिस्टर कार्यक्रम आहे. रविवारी,(१३ एप्रिल) दुपारी बारा वाजता महाप्रसाद आहे. रात्री आठ वाजता गीतराधाई हा मराठी गीतांचा लोकसंस्कृती सादरीकरणाचा कार्यक्रम आहे अशी माहिती मंडळाचे आधारस्तंभ नारायण गाडगीळ, गणपती हसनकर, सुभाष होसमनी यांनी दिली आहे.