Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
संजय घोडावत विद्यापीठातील ओंकार पडळकरचे क्रीडा स्पर्धेत यश जोतिबा यात्रेत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे औषधांचे मोफत वाटपसेवक संघाच्या अध्यक्षपदी मिलिंद भोसलेंची फेरनिवड, दोन तास सदस्यांत रंगली चर्चा !जिल्हा परिषद महिला सदस्याचे गंठण चोरटयांनी लांबविले, कसबा बावड्यातील प्रकारकोल्हापुरात शनिवारपासून आरपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ गिरीष फोंडेंवरील निलंबनाची कारवाई मागे घ्या ! महापालिकेवर मूक मोर्चा, जोरदार निदर्शने !! शिवाजी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अनिल साळोखे, उपाध्यक्षपदी विजय इंगवले मुख्याध्यापकांनीच मागितली लाच, पोलिसांनी रंगेहाथ पकडलेदूध उत्पादकांची चांदी, कर्मचाऱ्यांना दोन टक्के जादा बोनसशाखा अभियंता हुपरेंना कारणे दाखवा नोटीस, गायब पाण्याच्या टाक्यांची चौकशी सुरू

जाहिरात

 

इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने !  आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय, भाजपवर हल्लाबोल !!

schedule09 Apr 25 person by visibility 140 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : इंधन दरवाढीच्या विरोधात कोल्हापुरात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. छत्रपती शिवाजी चौक येथे बुधवारी (९ एप्रिल) आंदोलन झाले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी, डोक्यावर गॅस सिलेंडर घेऊन कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीच्या विरोधात घोषणा दिल्या. गॅस पन्नास रुपयांनी महागला. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले अशा संतप्त भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. सरकारने, दरवाढ मागे घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला.

 काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आंदोलन झाले. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात केंद्र सरकारतर्फे लागू करण्यात आलेल्या इंधन दरवाढीविरोधात निषेध आंदोलन झाले. आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. याप्रसंगी याप्रसंगी महिला काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सरला पाटील, माजी नगरसेविका भारती पोवार, संध्या घोटणे, पूजा नाईकनवरे, माधुरी लाड, उमा बनछोडे, वृषाली कदम, राणी खंडागळे,  चंदा बेलेकर, पूजा आरडे, वैशाली महाडिक, शुभांगी साखरे उज्वला चौगुले,  हेमा लुगारे पाटील, मीना कांबळे, सुमन ढेरे जया पवार,अलका सनगर, सिंधू शिरोळे,  टीना कांबळे, सुमन गुदूळे यांनी सहभाग घेतला.

 माजी नगरसेवक विक्रम जरग, प्रतापसिंह जाधव, राजाराम गायकवाड, रियाज सुभेदार, प्रकाश चौगुले, फिरोज सौदागर, विनायक घोरपडे, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यालयीन सचिव संजय पोवार- वाईकर, डॉ. प्रमोद बुलबुले,ब्लॉक अध्यक्ष किशोर खानविलकर, संपतराव चव्हाण,योगेश हतलगे, युसुफ शेख,युवक शहराध्यक्ष उदय पोवार, प्रथमेश कांबळे, गिरीश शिंदे,रोहन शारबिद्रे, विकी कांबळे, वरद चव्हाण, कृष्णात शिंदे, संदीप मोहिते,अमर जरग, नागेश नलावडे, अक्षय शेळके, कपिल सकते, आकाश शेलार उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes