स्नेहसंगीत प्रतिज्ञाच्या सांगितिक मैफिलीने रसिक मंत्रमुग्ध
schedule09 Apr 25 person by visibility 68 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ए मालिक तेरे बंदे हम... या भावपूर्ण प्रार्थनेने सुरवात झालेल्या सांगितिक मैफलीचा समारोप सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी.... या भावस्पर्शी गीताने झाली.“ना नफ्यासाठी ना स्वार्थासाठी आमची मैफिल गरजवंतांसाठी’ हे ब्रीद घेवून गरजूंसाठी विधायक कार्य करणार्या स्नेहसंगीत प्रतिज्ञाच्या कलाकारांनी छेडलेल्या स्वरांनी रसिक मंत्रमुग्ध झाले.
निमित्त होतं स्नेहसंगीत प्रतिज्ञा उपक्रमाच्या सातव्या वर्धापनदिनाचं. गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिराचा रंगमंच एका वेगळ्या संगीतसंध्येने सजला होता. कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे, उद्योजक अभय देशपांडे, सुषमा बटकडली, प्रतिज्ञाचे प्रशांत जोंशी यांच्या हस्ते या संगीतसंध्येचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रशांत जोशी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक़्रमात देखा एक ख्वाब, कजरा मुहब्बतवाला, शोखियों मे घोला जाए..., तेरे बिना जिंदगी से..., प्रियतमा ओ मेरी प्रियतमा..., बाहों के दरमिया..., हाल कैसा है जनाब का..., शुक्रतारा मंदवारा... यांसारखी गाजलेली गीते सादर करण्यात आली. या मैफिलीत 20 गायकांनी आपली गायन सेवा सादर केली. अश्विनी टेंबे यांच्या निवेदनाने मैफिलीस रंगत आणली.