भाजपा शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट, विश्वकर्मा योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी
schedule09 Apr 25 person by visibility 69 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सर्वसामान्या नगारिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहेत. या योजनांच्या माध्यमातून गरिब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी हाच सरकारचा उद्देश आहे. अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान विश्वकर्मा योजना आहे. परंतु सर्व सामान्य व्यक्तीला या योजनेचा लाभ प्रत्यक्षात मिळण्यामध्ये अनेक त्रुटी निर्माण झाल्या आहेत या योजनतील त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली. भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन दिले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष जाधव यांनी, या योजनेतील अनेक त्रुटी जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडल्या यामध्ये प्रामुख्याने आधार अपडेट करूनही नाव रजिस्टर होत नाही, जुना डाटा डिलिट होत नाही, नोंदणी होऊन सुद्धा प्रकरण जिल्ह्याला पोहोचत नाही, ग्रामपंचायतीने ok करून सुद्धा पेंडिंग दिसते, मंजूर होऊन सुद्धा ट्रेनिंग कॉल येत नाही हे निदर्शनास आणले. शिष्टमंडळातील अनेकांनी या योजनेतील त्रुटी नमूद केल्या. प्रकरणाचे पैसे बँकेत जमा होत नाहीत, बँक मॅनेजर सर्व्हे लावतात, सिबील स्कोअर विचारतात, नोंदणी केलेला घरातील सदस्य प्रकरण मंजूर झाल्यावर मयत झाला असून त्यामुळे पैसे मिळणार नाहीत हे समजल्याने घरातील इतर सदस्याची नोंदणी करायला गेल्यावर ती घेतली जात नाही, ट्रेनिंग सेंटर प्रत्येक तालुक्याला सहज उपलब्ध नाहीत हे सांगितले.
शिष्टमंडळात डॉ आनंद गुरव असंडोलीकर, सुशीला पाटील, अर्जुन सुतार, नंदकुमार कीर्तीकर, महेश यादव, विराज चिखलीकर, महेश चौगले, लालासो पोवार, रविकिरण गवळी, संगम नेसरीकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी येडगे यांनी या योजनेतील त्रुटी लवकर दूर करून नागरिकांना लाभ देण्यात येईल असे आश्वसन दिले. तसेच याविषयात पुढील आठवड्यात संबंधित सर्व अधिकाऱ्यांसोबत उच्च स्तरीय बैठक घेण्यात येईल असे सांगितले.