यशवंत ब्रिगेडतर्फे स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांचे वाटप
schedule09 Apr 25 person by visibility 104 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाला पाहिजे. तो अधिकारी होऊन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देऊन समाज विकासाच्या दिशेने गेला पाहीजे यासाठी यशवंत ब्रिगेड, महाराष्ट्र राज्यच्या माध्यमातून सामान्य परिवारातील विद्यार्थ्याना प्रत्येक वर्षी २५ हजार रुपयांची स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाटप करून मार्गदर्शन करण्यात येते. कोळेकर परिवार व यशवंत ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे सामाजिक कार्य अनेक वर्षापासून सुरू आहे.यासाठी समाजातून एक रुपयाही न घेता सामाजिक कार्य अविरतपणे चालू आहे.यावर्षीही अभ्यासू व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाटप करण्यात आली. यंदाही पुस्तकांचे वाटप झाले. यावेळी यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष प्रा.डॉ.संतोष कोळेकर, बाळासाहेब बरकडे, राहुल खरात, धनजय खरात, रमेश हराळे, दत्तात्रय बरकडे , अतुल चवरे, अनिल सुतार आदी उपस्थित होते. यशवंत ब्रिगेड सदैव समाजाच्या प्रश्नासाठी लढत असते. सामान्य परिवारातील विद्यार्थी शिक्षित झाला पाहिजे यासाठी यशवंत ब्रिगेड प्रत्येक वर्षी शालेय साहित्य, शालेय गणवेश वाटप करत असते. समाज शिक्षित झाला तरच विकास होऊ शकतो या भावनेतून निस्वार्थपणे यशवंत ब्रिगेड कार्य करत आहे. प्रत्येक वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी स्पर्धा परीक्षेतील यशस्वी उमेदवार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो.