Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
संजय घोडावत विद्यापीठातील ओंकार पडळकरचे क्रीडा स्पर्धेत यश जोतिबा यात्रेत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे औषधांचे मोफत वाटपसेवक संघाच्या अध्यक्षपदी मिलिंद भोसलेंची फेरनिवड, दोन तास सदस्यांत रंगली चर्चा !जिल्हा परिषद महिला सदस्याचे गंठण चोरटयांनी लांबविले, कसबा बावड्यातील प्रकारकोल्हापुरात शनिवारपासून आरपीएल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ गिरीष फोंडेंवरील निलंबनाची कारवाई मागे घ्या ! महापालिकेवर मूक मोर्चा, जोरदार निदर्शने !! शिवाजी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अनिल साळोखे, उपाध्यक्षपदी विजय इंगवले मुख्याध्यापकांनीच मागितली लाच, पोलिसांनी रंगेहाथ पकडलेदूध उत्पादकांची चांदी, कर्मचाऱ्यांना दोन टक्के जादा बोनसशाखा अभियंता हुपरेंना कारणे दाखवा नोटीस, गायब पाण्याच्या टाक्यांची चौकशी सुरू

जाहिरात

 

भक्तीतून घडतेय सहजसेवा ! रौप्यमहोत्सव अन्नछत्राचा, देणाऱ्या हातांचा - दातृत्वाच्या ओंजळीचा !!

schedule10 Apr 25 person by visibility 267 categoryसामाजिक

सहजसेवा ट्रस्टच्या अन्नछत्राचे रौप्यमहोत्सव

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : दख्खनचा राजा, जोतिबा ! असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान. दरवर्षी चैत्र महिन्यात यात्रा भरते. ‘चांगभलं’चा गजर करत दूरदूरवरुन भक्तगण दर्शनासाठी दाखल होतात. भाविकांनी डोंगर फुलतो.  या भाविकांच्या सोयीसाठी अन्नछत्र सुरू केले तर,संवेदनशील व्यक्तींच्या मनी सहज ही भावना उमटली आणि आकारला आले, सहज सेवा ट्रस्टचे अन्नछत्र !! २००१ मध्ये सुरू झालेल्या या ट्रस्टच्या अन्नछत्राचे यंदा २५ वे वर्ष आहे. ‘देणाऱ्याने देत जावे.’या भावार्थप्रमाणे दरवर्षी अन्नछत्राची व्याप्ती वाढत गेली. अन्नछत्राची रौप्यमहोत्सवी सेवा ही समाधानाची, आत्मिक सुखाची आहे. हा रौप्य महोत्सव देणाऱ्या हातांचा, दातृत्वाच्या ओंजळीचा आहे.’ अशी भावना संयोजकांची आहे.

जोतिबा यात्रा कालावधीत गायमुख परिसरात सहज सेवा ट्रस्टचे अन्नछत्र आहे यात्रा कालावधीत चारही दिवस अन्नछत्र सुरू असते. विशेष म्हणजे हे अन्नछत्र चालू असते. या मागील भावना स्पष्ट करताना ट्रस्टचे प्रमुख सन्मति मिरजे म्हणाले, ‘यात्रेसाठी आपआपल्या भागातून सासनकाठया घेऊन यायची पूर्वापार परंपरा आहे. परंपरेप्रमाणे आजही अनेक मानाच्या काठया घेऊन शेकडो लोक पायी चालत डोंगरावर येतात. लांबलांबवरुन येणारे हे भाविक कधी दिवसा तर कधी रात्री-अपरात्री जोतिबा डोंगरावर पोहचतात. त्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये या हेतूने त्यांच्या सोयीकरिता सहजसेवा ट्रस्टचे अन्नछत्र २४ तास सुरू असते. यंदाही १० ते १३ एप्रिल २०२५ या कालावधीत अन्नछत्र दिवस – रात्र सुरू असणार आहे.’

२००१ मध्ये अन्नछत्र सुरू करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला ते आज सत्तरीच्या पलीकडे गेलेले आहेत. दरम्यान आजही त्यातील अनेक मंडळी तरुणाईच्या जिद्दीने या सेवाकार्यात सक्रिय आहेत. अन्नछत्र कायमपणे सुरू राहावे यासाठी जुन्या मंडळींनी नव्या पिढीकडे सूत्रे सोपविली आहेत. पहिल्या वर्षी जवळपास पन्नास हजार भाविकांनी अन्नछत्राचा लाभ घेतला होता. २५ वर्षापूर्वी अन्नछत्र सुरू करण्यात सन्मति मिरजे, किरण शहा, कूप्पर शहा, अरविंद परमार, प्रमोद पाटील, सुर्यकांत गायकवाड, विनोद कांबोज  आदींचा पुढाकार होता. अन्नछत्र सुरू करण्याची संकल्पना उलघडताना प्रमोद पाटील म्हणाले, ‘‘१९९९-२००० मध्ये आम्ही सगळेजण अमरनाथ यात्रेला गेलो होतो. तेथील लंगर पाहिला. आणि त्या धर्तीवर जोतिबा डोंगर येथे अन्नछत्र सुरू करण्याचा विचार पुढे आला. नंतर अनेक जण या उपक्रमात जोडले.  प्रतिवर्षी अन्नछत्राची व्याप्ती वाढतच आहे.”

.

‘ चैत्र महिन्यात यात्रा असते, मात्र अन्नछत्रासाठी आमचे नियोजन तीन ते साडेती महिने अगोदर म्हणजे  जानेवारी महिन्यात सुरू होते. सगळया विभागाच्या परवानग्या, विविध घटकांशी संवाद साधला जातो. गेल्या पंचवीस वर्षात अन्नछत्राद्वारे लाखो भाविकांना सेवा दिली आहे. यंदाही अडीच लाख भाविक अन्नछत्राचा लाभ घेतील असे नियोजन केल्याचे ट्रस्टचे नव्या पिढीचे प्रतिनिधी चिंतन शहा, मनिष पटेल, रोहित गायकवाड यांनी सांगितले. जवळपास चारशे  स्वयंसेवक यात्रा कालावधीत सेवा देत असतात.

………………………

प्लास्टिक वापराला फाटा, पर्यावरणपूरक उत्सव

अन्नछत्रामध्ये यात्रेकरुंना जेवणासाठी भव्य मंडप उभारलेला असतो. भाविकासाठी चहा व मठृठा उपलब्ध असतो. अन्नछत्राचा मंडप वेगळा तर चहा-मठठासाठी वेगळा मंडप असतो. विशेष म्हणजे सहजसेवा ट्रस्टने अन्नछत्र परिसरात प्लास्टिक वापराला फाटा दिला आहे. प्लास्टिक कचरा निर्माण होऊ नये याकरिता जेवणासाठी स्टेनलेस स्टीलची ताटे वापरतात. चहा व मठठाकरिता स्टीलचे ग्लासचा वापर होतो. अन्नाची नासाडी टाळली जाते. निसर्ग रक्षणाचा हा कृतीशील उपक्रम पर्यावरणपूरक उत्सव बनला आहे.

…………………………….

समाजातील अनेक घटकांचा हातभार.

सहजसेवा ट्रस्टच्या अन्नछत्राला समाजातील विविध घटकाकडून नेहमीच सढळ हातभार लावला आहे. दानशूर व्यक्ती, संस्थांची मदत आहे.  जिल्ह्यातील साखर कारखाने, गोकुळ व वारणा दूध संघ, भारत डेअरी, विविध बँकांचा मोठा आधार आहे. कोण रोख स्वरुपात, कोण धान्य स्वरुपात तर कोण वस्तू स्वरुपात या अन्नछत्राची गोडी वाढवितात. सहजसेवा ट्रस्टचे संयोजकही कुठेही अन्नछत्रात कसल्याही प्रकारची कमतरता भासू नये यासाठी सेवा देत असतात.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes