संजय घोडावत विद्यापीठाचे एसजीयु आयकॉन पुरस्कार जाहीर, 28 फेब्रुवारीला वितरण
schedule13 Feb 25 person by visibility 281 categoryशैक्षणिक

मकरंद अनासपुरे, स्वप्निल कुसळे, डॉ. अशोक पुरोहित, डॉ. अनिल पाटील, महाबल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज.
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर: संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी २८ फेब्रुवारीला कला, साहित्य, उद्योग, शिक्षण, क्रीडा व समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना ''एसजीयु आयकॉन'' हा पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी कला आणि समाजसेवा उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मराठी सिनेमा कलाकार मकरंद अनासपुरे, क्रीडा क्षेत्रातून स्वप्निल कुसळे, वैद्यकीय क्षेत्रात डॉ. अशोक पुरोहित, प्रसिद्ध ईएनटी सर्जन, शैक्षणिक क्षेत्रात डॉ. अनिल पाटील रयत शिक्षण संस्था, उद्योग क्षेत्रात महाबल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण २८ फेब्रुवारी रोजी हिंदी फिल्म स्टार व गायक ‘आयुष्यमान खुराना’ आणि संजय घोडावत यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय घोडावत विद्यापीठ, अतिग्रे या ठिकाणी होणार आहे. अशी घोषणा विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी केली यावेळी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, रजिस्ट्रार डॉ. विवेक कायंदे, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी व विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आयुष्मान खुराना हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत
संजय घोडावत यांचा ६० वा वाढदिवस २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता घोडावत विद्यापीठाच्या प्रांगणात विविध कला, गुणदर्शनाने साजरा करण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, अधिकारी उपस्थित राहणार आहेत.