Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विद्यापीठ कायद्यात नाही निवडणूक पुढे ढकलण्याची तरतूद-वसंतराव मगदूमचंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत वेताळमाळ तालीम मंडळ उपांत्य फेरीत डीवाय पाटील साळोखेनगरमध्ये  इन्व्हेंट २०२५ उत्साहातभाजपा स्थापना दिन उत्साहात, कोल्हापुरात साखर-पेढे वाटप ! पदाधिकाऱ्यांच्या घरावर फडकला पक्षाचा झेंडा !!प्रा.नितीन जाधव यांना पुरस्कार स्थानिक आयटी कंपन्यांना विश्वासात घेऊनच आयटीपार्कचा आराखडा होणार-अमल महाडिककर्तृत्ववान महिलांचा ती ची शिदोरी पुरस्कारांनी सन्मानमहापुरुषांच्या मूल्यचौकटीचा वारसा आजच्या पत्रकारितेनेही पुढे न्यायला हवा-डॉ. राधेश्याम जाधवमॅनेजमेंट कौन्सिलच्या पुरुष गटातील निवडणूक पुढे ढकलली, विकास आघाडीला धक्का !!कोल्हापुरात नऊ एप्रिलला नमोकार महामंत्र पठण, महासैनिक दरबार हॉलमध्ये कार्यक्रम

जाहिरात

एकसष्ठी समारंभात संजय डी. पाटलांची मोठी घोषणा !  सयाजीचे विस्तारीकरण-हॉटेलसाठी २३ मजली इमारत उभारणार !!

schedule18 Feb 25 person by visibility 365 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘तरुण वयात माझ्यावर आई-वडिलांनी विश्वास टाकला, जबाबदारी सोपविली. त्यांच्या विश्वासाला न्याय देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला. वडील डॉ. डी.वाय. पाटील यांचे आशिर्वाद आणि आई शांतादेवी यांचे प्रेम यामुळेच जीवनात अनेक गोष्टी साकार झाल्याशिक्षण आणि मेडिकलच्या माध्यमातून लोकांची सेवा करा ही वडिलांची शिकवण कायमपणे जपली. आमची पुढील पिढीही लोकसेवेचा हा वसा पुढे चालवतील. . नवनवीन संकल्पना पाहणं, त्या सत्यात उतरविणं हा माझा ध्यास आहे. हॉटेल सयाजीचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. सयाजीलगतच हॉटेलसाठी २३ मजली इमारत उभारण्याच्या कामाचा शुभारंभ केला आहे. येत्या वर्षभरात ही इमारत तयार होईल. कदमवाडीतील हॉस्पिटल येथेही २३ मजली इमारत उभी होत आहे. येत्या वर्षभरात या इमारतीचे काम पूर्ण होईल..’

 हे शब्द आहेत, डॉ. डी. वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांचे ! १८ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांचा एकसष्ठी समारंभ दिमाखात साजरा झाला. कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल परिसरात एका शानदार सोहळयात डॉ. संजय डी. पाटील, वैजयंती पाटील यांचाा सत्कार करण्यात आला. नोबेल पारितोषिक विजेत कैलास सत्यार्थी, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, शांतादेवी डी. पाटील, आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, कुलपती डॉ. पी. डी. पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा समारंभ झाला.

सत्काराला उत्तर देताना पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. जुन्या काळातील आठवणी उलगडल्या. उपस्थितांशी जीवनप्रवास शेअर करताना  कधी भावूक झाले, तर कधी डोळयांच्या कडा ओलावल्या. संजय पाटील म्हणाले, ‘आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप भावनिक, आनंदादायी आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर, संघर्षात कुटुंबांनी मला साथ दिली. वयाच्या १८ व्या वर्षी माझ्यावर वडिलांनी विहिरी बांधकाम करण्याची जबाबदारी सोपविली. १९८४ मध्ये इंजिनीअर कॉलेज सुरू झाले. त्या कॉलेजची सगळी जबाबदारी माझ्यावर. इमारत बांधकामपासून कर्मचारी नियुक्तीपर्यत.१९८९ मध्ये मेडिकल कॉलेजला परवानगी मिळाली. त्याकाळी मेडिकल कॉलेज चालविणं अवघड होतं. पण सगळया गोष्टीवर मात करत मार्गाक्रमण केले.

लहानपणापासूनच मला शेतीची आवड. तरुण वयातच तळसंदे येथे २०५ एकर जमीन घेतली. सगळं माळरान. पाण्याचा पत्ता नाही.सगळयांनी, वडिलांना सांगितलं, की संजयचा जमीन खरेदीचा निर्णय चुकला. पण वडिलांचा विश्वास होता. त्यांचे स्वभाववैशिष्ट्यं म्हणजे, एकदा जबाबदारी सोपविली की ते कामात हस्तक्षेप करत नाही. तळसंदे येथील जमिनीचा आज कायापालट झाला. तेथे आंबा, नारळ, केळीच्या बागा आहेत. भाजीपाला पिकवला. फुलांची बाग आहे. दूध डेअरी आहे. हॉटेल सयाजीसाठी लागणारा भाजीपाला शेतातून येतो’हे सांगताना डॉ. संजय पाटील यांना गहिवरुन आले. माझ्या या साऱ्या वाटचालीत पत्नी वैजयंती यांची मोठी साथ आहे. हॉटेल सयाजी उभारले ते त्यांच्या आग्रहामुळेच. कोल्हापुरात चांगल्या हॉटेलची गरज होती, ती पूर्ण झाली.  

कदमवाडी येथे २२ एकर परिसरात हॉस्पिटल आहे. बेडची संख्या वाढवली. पहिल्यांदा ३००, नंतर ५०० आता ७५० बेडसची सोय आहे. गरीब रुग्णांवर मोफत उपचार, शस्त्रक्रिया होतात. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा लोकांना उपलब्ध करुन दिल्या. ज्यांना चालता येत नव्हतं, त्यांना उभं केलं हा सारा क्षण आनंदाचा आहे. हॉटेल सयाजीचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. सयाजी लगत आणखी २३ मजली इमारत होईल. आणखी रुम्स उपलब्ध होतील. वर्षभरात हे काम पूर्ण होईल याचा विश्वास आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाला जगातील पहिल्या ५००  विद्यापीठात स्थान मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. कोल्हापुरात बिझनेस स्कूल करण्याचा विचार आहे. छोटया-छोटया गोष्टीतही मी आनंद मानतो. ज्या गोष्टी समोर येतील त्याला स्विकारतो. चांगल्या गोष्टी करत राहतो. ’अशा शब्दांत पाटील यांनी आपल्या जीवनाचे सार सांगितले.  

जाहिरात

Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes