Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सहज सेवा ट्रस्टतर्फे गायमुख येथे चार दिवस अन्नछत्र शिक्षण संचालकांसोबतची चर्चा फिस्कटली ! शिक्षकांचा निपुण ऑनलाइन कामावर बहिष्कार कायम !!शिवाजी विद्यापीठात बुधवारी तीन मोठ्या पुरस्कारांचे वितरण, सदानंद मोरेंची प्रमुख उपस्थितीशिवाजी विद्यापीठात फुले – शाहू - आंबेडकर सप्ताहाचे आयोजन सायबर महाविद्यालयामध्ये बुधवारी नोकरी महामेळावासतेज पाटील क्रिकेट चषक स्पर्धेत शाहूपुरी जिमखाना, भिडे स्पोर्टस, अण्णा मोगणे संघाचे विजयसुनीलकुमार लवटेंचा शुक्रवारी अमृतमहोत्सवी सत्कार, गिरीश कुबेरांचे व्याख्यान डॉ. पराग तांबेरी यांच्या कार्डियाक सेंटरचे उद्धाटन संभाजी महाराजांची जयंती राष्ट्रीय धर्मवीर दिन म्हणून जाहीर करावीभाजपा स्थापनादिनानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान

जाहिरात

 

डीवाय पाटील साळोखेनगरमध्ये  इन्व्हेंट २०२५ उत्साहात

schedule06 Apr 25 person by visibility 65 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमधील कल्पकता आणि तांत्रिक कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग साळोखेनगर मध्ये इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन  (आयएसटीई) च्या सहकार्याने इन्व्हेंटो २०२५ चे आयोजन केले होते. 
आयएसटीईचे एक्झिक्युटिव्ह कौन्सिल मेंबर आणि कसबा बावडा पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी बोलताना प्राचार्य नरके म्हणाले, विद्यार्थ्यांनी आज समाजाला भेडसवणाऱ्या विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा   विद्यार्थ्यांनी महाविद्यालय जीवनात उद्योग व्यवसायांसाठी आवश्यक असणाऱ्या कुशल मनुष्यबळासाठीची कौशल्य आत्मसात करावीत या उद्देशान इन्व्हेंटो सारख्या टेक्निकल इवेंटचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगत अशा इव्हेंट मधील सहभागातून भविष्यातील नव्या स्टार्टअपच्या संकल्पना उदयाला येतील.
 यावेळी कॅम्पसचे संचालक डॉ. अभिजित माने यांनी बोलताना अशा प्रकारच्या इव्हेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील  इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी यांना विशेष प्राधान्य देण्यात आले होते असे सांगितले.यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश माने यांनी कॉलेजच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास उपक्रमांची माहिती दिली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यासह, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे येथील विविध डिप्लोमा व डिग्री महाविद्यालयातून ७५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विजेत्यांना रोख बक्षीस, ट्रॉफी तसेच सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले. या इव्हेंटचे संयोजन डीन स्टुडन्ट वेल्फेअर गौरव देसाई व सहकाऱ्यानी केले. 

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes