कर्तृत्ववान महिलांचा ती ची शिदोरी पुरस्कारांनी सन्मान
schedule05 Apr 25 person by visibility 249 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संस्कार शिदोरी मंच आयोजित चैत्र सोहळा कार्यक्रम उत्साहात झाला. छत्रपती शिवाजी मंदिर येथे आयोजित कार्क्रमात महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती, वारसा जपणाऱ्या कर्तृत्ववाण महिलांचा "ती ची शिदोरी "हा सन्मान देऊन गौरवण्यात आले. उद्योजिका स्मिता शिरगांवकर यांच्या हस्ते आणि संस्कार मंचच्या अध्यक्ष स्मिता खामकर यांच्या उपस्थितीमध्ये झाला.
या समारंभात भजन कला -राधा कृष्ण भजनी मंडळ, रांगोळी कला - धनश्री बाटे, ज्ञानेश्वरी लिखाण -हेमालता देवमोरे,. लावणी कला -श्रद्धा शुक्ल, सॅलड डेकोरेशन नक्षी काम -पद्मा पाटील, स्वयंपाक कला -मंजिरी कपडेकर, रेकी कला -राधिका कुमठेकर, मूर्ती काम - सुभद्रा वडणगे, बुरुड काम -शकुंतला कोरवी, योग कला -अनुराधा ढवळे, स्वसंरक्षण -जुदो - अर्चना बराले, गोधडी कला -अर्चना पाटील, लाठी काठी -शांतिदूत मर्दानी आखाडा, मंगळागौर कला -श्रावण कल्चर ग्रुप, आपत्कालीन सेवा -भाग्यश्री पाटील, कवयित्री वनिता पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याला डॉ अश्विनी औताडे, नैना परुळेकर, मनीषा जाधव, शुभांगी साखरे, प्रिया नाझरे उपस्थित होत्या. नीता पुजारी आणि तेजस्विनी पेडणेकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी संस्कार शिदोरी मंचच्या खामकर,अश्विनी बेंडके, अहिल्या धुमाळ,अर्चना पाटील, पल्लवी घाटगे, पूजा मेथे, शुभांगी सोयाम, सरिता गवळी यांनी परिश्रम घेतले.