Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
तत झदमहापुरुषांच्या मूल्यचौकटीचा वारसा आजच्या पत्रकारितेनेही पुढे न्यायला हवा-डॉ. राधेश्याम जाधवमॅनेजमेंट कौन्सिलच्या पुरुष गटातील निवडणूक पुढे ढकलली, विकास आघाडीला धक्का !!कोल्हापुरात नऊ एप्रिलला नमोकार महामंत्र पठण, महासैनिक दरबार हॉलमध्ये कार्यक्रममंत्री मुश्रीफांच्या वाढदिवसानिमित्त शहर राष्ट्रवादीतर्फे स्वाभिमानी सप्ताह-आदिल फरासशालिनी सिनेटोनमधील राखीव भूखंड हडपण्याचा प्रकार, मनसे आंदोलन करणारकोल्हापुरात शिक्षण सहसंचालक पूर्ण वेळ हवेत- युवा सेना आक्रमकदेऊ या गरजूंना साथ, सतेज पाटील यांच्या वाढदिनी मदतीचा हातकाँग्रेस घेणार प्रत्येक जिल्हयाचा आढावा, पुणे जिल्हयाच्या निरीक्षकपदी सतेज पाटीलखंडपीठासाठी करवीरनिवासिनी अंबाबाईला साकडे, पंढरपुरातून रथयात्रा

जाहिरात

 

कोल्हापुरात नऊ एप्रिलला नमोकार महामंत्र पठण, महासैनिक दरबार हॉलमध्ये कार्यक्रम

schedule05 Apr 25 person by visibility 62 category

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : भगवान महावीर जयंती महोत्सवाचे औचित्य साधून "जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्यावतीने (जीतो)  नऊ एप्रिल 2025 रोजी सकाळी साडेसात ते नऊ या वेळेत नमोकार महामंत्र पठण कार्यक्रम होणार आहे. महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित या कार्यक्रमात साधारणपणे 5000 नागरिक सहभागी होतील. जैन बांधवास अन्य समाजातील नागरिकांचा यामध्ये सहभाग असणार आहे अशी माहिती जीतो कोल्हापूरचे चेअरमन रवी संघवी, समन्वयक जितेंद्र राठोड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

जैन धर्मातील नवकार महामंत्र हा शक्तीशाली मंत्र मानला जातो. या मंत्राने आत्मकल्याण होऊन मोक्षमार्गाची दिशा मिळते. या मंत्राद्‌वारे सामूहिक मंत्र पठण केल्याने एक वैश्विक ऊर्जा निर्माण होऊन जगभरामध्ये सुख-शांती नांदेल या भावनेने जगभरातील 108 देशांमध्ये 9 एप्रिल रोजी एकाच वेळेला नमोकार महामंत्र पठण होणार आहे. देशात ही विविध ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथून या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होणार आहेत.

दरम्यान जीतो कोल्हापूर आणि इचलकरंजी चॅप्टरच्यावतीने कोल्हापूर, सांगली,  इचलकरंजीसह जिल्ह्यातील विविध गावांमध्ये व कर्नाटक भागातील सर्व जैन श्रावक है एकत्रितपणे जैन मंदिर आणि तीर्थक्षेत्र व विविध ठिकाणी एकत्रित नमोकार महामंत्र पठण करतील. कार्यक्रमांमध्ये जैन समाजाबरोबर इतर समाजही सामील होणार आहेत. 

कोल्हापूर चॅप्टरच्यावतीने शहर आणि ग्रामीण भागातील दिगंबर, श्वेतांबर, तेरापंथी या सर्व पंथीय जैन बाधवासाठी "महासैनिक दरबार हॉल", सर्किट हाउस रोड, बावडा येथे आयोजन केले असून त्यांचे मुख्य प्रायोजक "संजय घोडावत ग्रुप" आहे. पत्रकार परिषदेला जीतोचे मानद सचिव अनिल पाटील,  राजीव परीख, गिरीश शहा, रवींद्र देवमोरे, युध विंग चेअरमन प्रतिक ओसवाल, लेडीज विग माया राठोड उपस्थित होते. जीतो इचलकरंजी चॅप्टरच्या वतीने 'नामदेव भवन साउंड इचलकरंजी येथे आयोजन केले असून चेअरमन महावीर बागरेचा, सचिव मुकेश पुनविया, युध विंग, लेडीज विरा यांनी नियोजन केलेले आहे भगवान महावीरांनी दिलेला विश्वशांती, अहिंसा संदेश जगाला देण्यासाठी सर्वानौ सहभागी होण्यासाठी https://navkardivas.Jitoworld.org/City KolhapurChapter&ReferralCode=Kolhapur-chapter या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes