Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सहज सेवा ट्रस्टतर्फे गायमुख येथे चार दिवस अन्नछत्र शिक्षण संचालकांसोबतची चर्चा फिस्कटली ! शिक्षकांचा निपुण ऑनलाइन कामावर बहिष्कार कायम !!शिवाजी विद्यापीठात बुधवारी तीन मोठ्या पुरस्कारांचे वितरण, सदानंद मोरेंची प्रमुख उपस्थितीशिवाजी विद्यापीठात फुले – शाहू - आंबेडकर सप्ताहाचे आयोजन सायबर महाविद्यालयामध्ये बुधवारी नोकरी महामेळावासतेज पाटील क्रिकेट चषक स्पर्धेत शाहूपुरी जिमखाना, भिडे स्पोर्टस, अण्णा मोगणे संघाचे विजयसुनीलकुमार लवटेंचा शुक्रवारी अमृतमहोत्सवी सत्कार, गिरीश कुबेरांचे व्याख्यान डॉ. पराग तांबेरी यांच्या कार्डियाक सेंटरचे उद्धाटन संभाजी महाराजांची जयंती राष्ट्रीय धर्मवीर दिन म्हणून जाहीर करावीभाजपा स्थापनादिनानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान

जाहिरात

 

भाजपा स्थापना दिन उत्साहात, कोल्हापुरात साखर-पेढे वाटप ! पदाधिकाऱ्यांच्या घरावर फडकला पक्षाचा झेंडा !!

schedule06 Apr 25 person by visibility 65 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  भारतीय जनता पार्टीचा ४५ वा स्थापना दिवस भाजपा कोल्हापूरच्या वतीने संपूर्ण शहरात मोठ्या उत्साहात झाला. जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या सात मंडलांमध्ये साखर पेढे वाटून, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, जय श्रीराम अशा घोषणा याप्रसंगी देण्यात आल्या. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा स्वतःच्या घरावर फडकवला.

 भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दुपारी एक वाजता एकत्र येत जिल्हा कार्यालयामध्ये सर्वांनी संघटन पर्व कार्यकर्ता संवाद या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी प्रदेश सचिव महेश जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रवास सांगितला. जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी भाजपची कार्यपद्धतीविषयी सांगितले. मंत्री चंद्रकांत पाटील यांचे उदाहरण देत सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती संघटनात्मक रचनेमुळे मंत्री पदाला गवसणी घालतो हे निदर्शनास आणले.

कार्यक्रमाला  मामा कोळवणकर, संपतराव पवार, दिलीप मेत्रानी, प्रमोदिनी हार्डीकर, किशोरी स्वामी, प्रभावती इनामदार, डॉ राजवर्धन, अशोक देसाई, हेमंत आराध्ये, विराज चिखलीकर, अप्पा लाड, राजू मोरे, शैलेश पाटील, गणेश देसाई, उमा इंगळे, धनश्री तोडकर, भरत काळे, संतोष भिवटे, मंगला निप्पानीकर, प्रदीप उलपे, सचिन कुलकर्णी, विशाल शिराळकर, सुधीर देसाई, गिरीश साळोखे, संतोष माळी, प्रग्नेश हमलाई, सयाजी आळवेकर, हर्षद कुंभोजकर, अशोक लोहार, परवेज पठाण, सचिन सुराणा, किसन खोत, विजय गायकवाड, योगेश कांगटाणी, शामली भाकरे, हंबीरराव पाटील, दता मेडशिंगे, श्वेता गायकवाड, अनिता ढवळे, शारदा पोटे, संदीप कुंभार, महेश यादव, पारस पलीचा, वंदाना बंबनवाड, सुजाता पाटील, रविंद्र पोवार, युवराज शिंदे, सुनील पाटील, अमेय भालकर, मानसिंग पाटील, रविकिरण गवळी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes