विद्यापीठ कायद्यात नाही निवडणूक पुढे ढकलण्याची तरतूद-वसंतराव मगदूम
schedule06 Apr 25 person by visibility 226 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘विद्यापीठ कायद्यात निवडणूक पुढे ढकलण्याची तरतूद नाही.’ असे मत शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघाचे वसंतराव मगदूम यांनी व्यक्त केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवडण्यात येणाऱ्या पुरुष गटातील एका जागेसाठीची ११ एप्रिल रोजी होणारी निवडणूक विद्यापीठ प्रशासनाने पुढे ढकलली आहे. शिवाय याविषयी कुलपती कार्यालयाकडे मार्गदर्शन मागविले आहे.
कुलगुरू डी. टी. शिर्के यांच्या या निर्णयावर कर्मचारी संघाचे मगदूम यांनी म्हटले आहे, ‘प्रा. एस. पी. हंगेरगीकर यांची विद्यापीठ कायदा कलमनुसार रिक्त जागेवर शिक्षक पदावर उर्वरित कालावधीसाठी विद्यापरिषदेवर निवड करण्यात आली आहे. ही निवड निवडणूक प्रक्रियेचा एक भाग आहे. विद्यापीठ कायद्याने स्थायी समितीला तसा अधिकार आहे. त्यामुळे हंगेरीकर हे इलेक्टेड टीचर होतात. कुलगुरुंनी, कुलपती कार्यालयाकडे मार्गदर्शन मागविले असले तरी निवडणूक पुढे ढकलण्याची तरतूद विद्यापीठ कायद्यात नाही.’