चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत वेताळमाळ तालीम मंडळ उपांत्य फेरीत
schedule06 Apr 25 person by visibility 67 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळ आयोजित व जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत "चंद्रकांत चषक -२०२५" फुटबॉल स्पर्धेत रविवारपासून उपांत्य पूर्व फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली. वेताळमाळ तालीम मंडळाने शिवाजी तरुण मंडळाचा टाय ब्रेकरवर ३-२ असा पराभव करत, उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सामन्याची सुरुवात मॅकचे उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, अॅड विद्याधर चव्हाण, उद्योजक दीपक निकम, रणजीत मोरे, राजेंद्र साळोखे, यशवंत पाटील, नितीन दलवाई, अनिल कोराने, संजय पवार, प्रवीण तावरे, शशिकांत चिगरे, सनी चौगुले, दीपक निकम, राजू साळोखे, राजाराम निकम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली.
वेताळमाळ तालीम मंडळ व शिवाजी तरुण मंडळ यांच्यातील सामना अत्यंत अटीतटीचा झाला. निर्धारित वेळेत हा सामना निर्धारित वेळेत १-१ असा बरोबरीत राहिला. त्यामुळे टायब्रेकरवरती सामन्याचा निकाल लागला. यामध्ये ३-२ असा शिवाजी तरुण मंडळाचा पराभव करत वेताळमाळ तालीम मंडळाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून वेताळमाळ तालीम मंडळाच्या विशाल कुरणेची निवड झाली. युवा उद्योजक सत्यजित जाधव, फत्तेसिंग सावंत, सागर भांदिगरे, मोईन मोकाशी यांच्या हस्ते सामनावीरचेबक्षीस देण्यात आले.